मुंबई : बॉलिवूडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माहिती व प्रसारण मंत्री प्रकार जावडेकर यांनी मंगळवारी ट्विटरवरून याची माहिती दिली. यानंतर चाहते आणि कलाकारांकडून बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबरोबरच मुलगा अभिषेक बच्चन याने देखील ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकार जावडेकर यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटलं की, खूप जास्त आनंद आणि अभिमान. 



माहिती व प्रसारण मंत्री प्रकार जावडेकर यांनी ट्विटरवर लिहिले होते की, दोन पिढ्यांना प्रेरित करणारे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची दादासाहेब फाळके पुरस्काराकरता निवड झाली आहे. मी मनापासून शुभेच्छा देतो. 



पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच स्तरावरून अमिताभ यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील अमिताभ बच्चन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. महानायकाच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.