मुंबई : पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या विदुथलाई या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.  साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजय सेतुपती यांच्या चित्रपटाच्या सेटवर एक अपघात झाला आहे. या अपघातात 54 वर्षीय स्टंट मॅनचा मृत्यू झाला आहे.  वंडलूर येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात सुरेश सहाय्यक स्टंट दिग्दर्शकासोबत काम करत होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला होता. तेथे डेब्रिज ठेवण्यात आले होते. दोरीने बांधल्यानंतरही त्याला जंपिंग स्टंट करावा लागला. अचानक सेटवर एक अपघात झाला. स्टंट मॅन एस सुरेश विजय सेतुपती यांच्यासाठी स्टंट करत असताना त्याचा अपघात झाला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.


20 फूट उंचीवरून पडला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरेशला दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधण्यात आलं होतं. मात्र सीन सुरू होताच दोर तुटला आणि स्टंट मॅन सुरेश खाली पडला. सुरेश सुमारे 20 फुटांवरून खाली पडला आहे. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


स्टंट करताना मृत्यू
पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाच्या विदुथलाई या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. वंडलूर येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. चित्रपटात सुरेश सहाय्यक स्टंट दिग्दर्शकासोबत काम करत होता. चित्रपटाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला होता. तेथे डेब्रिज ठेवण्यात आले होते. दोरीने बांधल्यानंतरही त्याला जंपिंग स्टंट करावा लागला.


पोलिसांनी तपास सुरू केला
सेटवरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरेश 25 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय होता. तो सुरुवातीपासूनच स्टंट मॅन होता. त्याचबरोबर या अपघातानंतर शूटिंगला ब्रेक लागला आहे.