गजबजलेल्या मुंबईत दडलयं घनदाट जंगल; कधीही न पाहिलेले पक्षी येथे दिसतील

शहराप्रमाणे आता गावातही पक्षी पाहणं दुर्मिळ झालं आहे, म्हणूनच जर तुम्ही पावसाळ्यात बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर कर्नाळा पक्षीअभयारण्याला नक्की भेट द्या.  

Jun 28, 2024, 20:43 PM IST

पावसाळ्यात निसर्गाचं विलोभनीय रुप अनुभवण्यासाठी पर्यटक कायमच वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतात. दरवर्षी पावसाळी सहल कुठे न्यावी हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. 

1/9

दरवर्षी पावसाळ्यात कुठे जावं हा प्रश्न अनेकांना पडतो. पुणे आणि मुंबईपासून जवळच असलेला किल्ले कर्नाळा हा पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. 

2/9

किल्ले कर्नाळा आणि कर्नाळा पक्षीअभयारण्याचं सौंदर्य पावसाळ्यात मनाचा ठाव घेतं. आजूबाजूची हिरवाई आणि दुर्मिळ प्रजातीचे पक्षी हे कर्नाळा किल्ल्याचं खास वैशिष्ट्यं आहे. 

3/9

मालबार व्हिसलिंग थ्रश, मॅग्पी रॉबिन आणि पॅराडाईज फ्लायकॅचर यांसारख्या विदेशी पक्ष्यांचं पावसाळ्यात इथे वास्तव्य असतं.   

4/9

भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे हे याठिकाणी मुक्त संचार करत असतात. म्हणूनच जून ते सप्टेंबर महिन्यात पक्षीप्रेमी या अभयारण्याला कायमच भेट देतात.   

5/9

असं म्हणतात की, कर्नाळ्यात दरवर्षी 125 ते 150 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.   

6/9

शहरीभागात चिमण्या, पोपट आणि कावळ्यांच्या प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं प्रशासनाने वारंवार स्पष्ट केले. मात्र कर्नाळा पक्षी अभयारण्यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज असे सहसा न दिसणाऱ्या पक्षांचा या ठिकाणी वावर असतो.

7/9

पनवेलपासून जवळच कर्नाळा किल्ल्यावरील हे अभयारण्य खास पक्षांच्या विविध प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.  या ठिकाणी आंबा, जांभूळ आणि सागाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. 

8/9

पुर्वी या भागात कातकरी, वारली आणि आदिवासी लोकांचा वावर जास्त असायचा . त्यामुळे फळं विकून उदरनिर्वाह करणं हा येथील आदिवासी समाजाचा प्रमुख व्यवसाय होता.   

9/9

बहरलेली हिरवीगार झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायचा असेल तर, पावसाळ्यात कर्नाळापक्षी अभयारण्यास नक्की भेट द्या.