Atul Parchure Death: अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.  अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्ये विविधरंगी भूमिका साकरल्या होत्या. हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट ही सर्वांनाच धक्का देणारी ठरतेय. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.विनोदी ढंगाच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. अनेक दिवसांपासून रुग्णलयात सुरु होते. जीवघेण्या कॅन्सर विरुद्धची झुंज त्यांनी जिंकली होती. सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' पॉडकास्टमध्ये त्यांनी कॅन्सरच्या दिवसातली आठवण सांगितली होती. 


'डॉक्टरांना मी घाबरलेले पाहिले' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 ला लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अतुल परचुरे कुटुंबासोबत ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंडला गेलो होते. तिकडे गेल्यावर काय काय खायचं?हा प्लानिंग त्यांनी आधीच केला होता. पण ऑस्ट्रेलियात गेल्यावर तिथे काहीच खायची त्यांना इच्छा होत नव्हती. न्यूझिलंडला त्यांनी 4 ते 5 तास गाडी चालवली. सर्व व्यवस्थित होतं फक्त काही खाण्याची इच्छा होत नव्हती. काविळ झाल्याचा अंदाज त्यांना वाटत होता.  भारतात आल्यानंतर त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर अल्ट्रा सोनोग्राफी केली. त्यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले त्यांना दिसले. डॉक्टरांना मी घाबरलेले पाहिले असे अतुल परचुरेंनी सांगितले. यावेळी काहीतरी गंभीर आहे, याची मला जाणिव झाल्याचे त्यांनी सांगितले. पण कॅन्सर वैगेरे असेल असे त्यांना वाटले नव्हते. 


ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन


'म्हणजे मला कॅन्सर झालाय?'


डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आणखी चाचण्या केल्या. एकदा डॉक्टरांनी भेटायला बोलावलं. तुमच्या लिव्हरमध्ये ट्यूमर असल्याचे दिसतंय. तुम्ही काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. म्हणजे मला कॅन्सर झालाय? असा प्रश्न अतुल परचुरेंनी डॉक्टरांना विचारला. यावर त्यांनी 'हो' असं म्हटलं. यानंतर अतुल परचुरे घरी गेले आणि सर्वात आधी त्यांनी आईला याबद्दल सांगितलं. तुला काहीही होणार नाही असा विश्वास आई आणि बायकोने त्यावेळी आपल्याला दिल्याचे ते म्हणाले. आयुष्यात अशा घटना घडत असताना तुम्हला कोणावर तरी श्रद्धा हवी, मग ते कोणी असो. एखादा व्यक्ती असो, देव असो किंवा एखादं पुस्तक असो. काहीही असो. माझी माझ्या कुटुंबावर खूप श्रद्धा आहे. या दोघी माझ्यासोबत असतील तर काहीच होणार नाही, हे मला माहिती होतं, असं ते म्हणाले. 


'प्रिय अतुल, खरं खरं सांग' परचुरेंच्या निधनानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भावूक पोस्ट


आणि सर्वच चुकत गेलं


कॅन्सरसाठी मी पहिली सर्जरी केली पण ती चुकलीय त्यानंतर सर्व चुकतच गेलं, तिथे गडबड झाली, असे अतुल परचुरे यांनी 'मित्र म्हणे' च्या पॉडकास्टवर सांगितलं. यानंतर दुसरं, तिसरं प्रोसिजर केलं. आता यानंतर आपण लिव्हर ऑपरेट करता येतंय का पाहू? असे डॉक्टर म्हणाले. आमच्याकडे मार्ग नाही असे ते म्हणाले. 15 फेब्रुवारीला मी घरी आलो तेव्हा पाय खूप सुजले होते. बोलता बोलता घसा सुकायचा. बोबडी वळायची. एकाच हॉस्पीटलमध्ये 3 वेगवेगळे डॉक्टर उपचार करत होते. एका नावाजलेल्या रुग्णालयात हे सुरु होतं. एक प्रोसिजर सुरु झाली तर ती पूर्ण व्हायला हवी, म्हणून कोणाला इतर सांगता आलं नाही. यानंतर डॉक्टर बदलण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात. 15 मार्च नंतर माझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे ते सांगितले होते.