Inder Kumar : बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. तर एक काळ असा होता जेव्हा ईशा कोप्पीकर आणि दिवंगत अभिनेता इंदर कुमार हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, ईशा कोप्पीकरपासून विभक्त झाल्यानंतर इंदर कुमार तिला विसरू शकले नव्हते याचा खुलासा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सोनलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा कोप्पीकर आणि आणि इंदर कुमार या दोघांनी 'एक था दिल एक थी धडकन' या 1998 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात काम केलं होतं. तर इंदर कुमारचं ईशा कोप्पीकरवर असलेल्या प्रेमावर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सोनलनं 'स्पॉटबॉय'ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. सोनल यावेळी, म्हणाली "इंदरचे ईशा कोप्पीकरवर असलेले प्रेम आमच्या घटस्फोटासाठी कारणीभूत होते. खरंतर लग्नानंतरही तो तिला विसरू शकत नव्हता आणि तिला भेटत होता." पुढे सोनम म्हणाली की "तिनं इंदरला इतकं देखील सांगितलं होतं की त्याला जर ईशाला भेटायचं असेल तर तो तिला घरी बोलवू शकतो. पण तो कधीच ईशाला विसरू शकला नाही. मला असं वाटतं की पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही."



प्रेग्नंट असल्याचे सांगितल्यानंतर इंदरची काय प्रतिक्रिया होती हे सांगत सोनल पुढे म्हणाली, "खरंतर लग्नाआधी मला अनेकांनी बजावून सांगितलं होतं की त्याच्याशी लग्न करू नकोस. तो अजूनही ईशाला विसरलेला नाही. तर लग्नानंतर हे खरंच ठरलं. त्यात जेव्हा मी त्याला माझ्या प्रेग्नंसी विषयी सांगितलं तेव्हा त्याला आनंद तर झाला नाहीच पण त्यानं थोडाही रस घेतला नाही. त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला." 


इंदर व्यसनाच्या आहारी गेल्याविषयी सांगत सोनल पुढे म्हणाली, "इंदरला व्यसन लागल्यानंतर त्याला हळूहळू काम मिळणं देखील बंद झालं होतं. त्यामुळे तो अजून जास्त मद्यपान करू लागला. मी त्याला मेसेज करत सांगितलं की तो आता एका मुलीचा बाप झाला आहे. त्या मेसेलाही त्यानं रिप्लाय केला नव्हता." 


हेही वाचा : "1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड


दरम्यान, सोनल आणि इंदरचा घटस्फोट झाल्यानंतर त्यानं 2009 साली कमलजीत कौरसोबत लग्न केलं पण त्याचा त्याच वर्षी घटस्फोट झाला. त्यानंतर 2013 पल्लवी सराफसोबत लग्न केले. हे लग्न देखील फार काळ टिकले नाही आणि लग्नाच्या चार वर्षात म्हणजेच 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्याच वर्षी इंदर कुमारचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. निधनानंतर इंदरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तो मद्यधुंद अवस्थेत होता.