कोणाला Kiss करतेय आर. माधवनची पत्नी? पाहून तो किंचाळलाच
त्या दोघांमध्ये सगळं ठिकंय ना?
मुंबई : तरुणींच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आर. माधवन यानं शाहरुख, सलमानलाही टक्कर दिली. आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारा हा अभिनेता वय वाढत असताही तितकाच रुबाबदार दिसतो हेसुद्धा कोणीच नाकारणार नाही. मुळात एक अभिनेता म्हणून त्यानं जितकी लोकप्रियता मिळवली त्याहूनही जास्त लोकप्रियता त्याच्यात दडलेल्या माणसानं मिळवली. (R madhavan)
कलेवर प्रेम करण्यासोबतच या अभिनेत्यानं त्याच्या कुटुंबालाही कायमच प्राधान्यस्थानी ठेवलं. पण, आता म्हणे या अभिनेत्याच्या पत्नीचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका वयोवृद्ध व्यक्तीला Kiss करताना दिसत आहे.
माधवनची व्यक्ती कोणाला Kiss करतेय हे पाहून तुम्हीही हैराण व्हाल ना? हा फोटो पाहिल्यानंतर काहींनी तर, त्या दोघांच्या वैवाहिक नात्यात सर्वकाही ठीक आहे ना असा प्रश्नही केला.
इतकंच काय, तर माधवनच्या पत्नीच्या भावानं जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा तो चक्क किंचाळला. त्याला एकाएकी धक्काच बसला. तुमच्यासोबतही असंच घडलंय का?
चिंता करु नका, ही वयोवृद्ध व्यक्ती दुसरंतिसरं कुणी नसून खुद्द माधवनच आहे. ‘रॉकेटरी: द नांबी इफेक्ट’ या आगामी चित्रपटाच्या लूकमध्येच त्यानं पत्नीसोबतचे हे क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले आहेत.
इस्रोतील माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर बेतलेल्या घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटात माधवन मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. हा चित्रपट इंग्रजी, तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वी आर. माधवननं केलेली ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली?