Boycott Brahmastra ट्रेंडवर अभिनेता Ranbir Kapoor ची पहिली प्रतिक्रिया, `चित्रपट फ्लॉप होण्यासाठी...`
पत्रकार परिषदेत रणबीर कपूरने चित्रपट बहिष्काराच्या ट्रेंडवर मौन सौडलं.
Ranbir Kapoor Statement on Boycott Brahmastra: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी अवघे काही तास उरले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मात्र हा चित्रपट वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड जोर धरत आहे. असं असताना चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही जोरात सुरु आहे. त्यामुळे चित्रपट हिट की फ्लॉप येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. या चित्रपटाची टीम दिल्लीत प्रमोशनसाठी पोहोचली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत रणबीरने चित्रपटाच्या बहिष्काराच्या ट्रेंडवर मौन सौडलं.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणबीर कपूर यांनी सांगितलं की, "चित्रपट तेव्हाच चालतो जेव्हा त्या चित्रपटाच आशय चांगला असतो. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्याशी जोडू शकतील. चित्रपट पडण्याचे कारण फक्त आणि फक्त चित्रपटाचा आशय असतो." शमशेरा चित्रपटाचा फ्लॉप असल्याचाही संबंध जोडत सांगितलं की, "चित्रपटाच्या कंटेंटमध्ये काही प्रॉब्लेम असल्याने चालला नाही. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंड आणि कँसल कल्चर चित्रपट फ्लॉप होण्याचे एकमेव कारण असू शकत नाही."
अयान मुखर्जीचा हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास 410 कोटी रुपये आहे. सध्या ट्विटर वर #BoycottBrahmastra #BoycottBollywood" हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.