भारतात आहे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव! इथं 17 बॅंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना सुरु करायचीय आपली शाखा?

भारतातील सर्वात श्रीमंत... या गावात तब्बल 17 बँंका आहेत. 

| Nov 09, 2024, 17:48 PM IST

Asia Richest Village : भारतात एक असे गाव जिथे एक दोन नाही तर तब्बल 17 बँंका आहेत. एकाच गावात 17 बँंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना इथं आपली शाखा सुरु करायची आहे. गुजरात राज्यात हे गाव आहे.  या गावात असं आहे  तरी काय जाणून घेऊया.

1/7

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या भारतात आहे. आधीच इथं 17 बॅंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.

2/7

स्वतःचा शॉपिंग मॉल आहे, ज्यामध्ये जगभरातील मोठे ब्रँड आहेत. येथील लोक आजही शेती करतात. मात्र, परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा यांच्या खात्यात जमा होतो. 

3/7

माधापर गावातील लोक परदेशातून पैसे कमवून गावातील बँकांमध्ये ट्रान्स्फर करतात. या गावातील प्रत्येक घरातील किमान 2 लोक परदेशात राहतात.

4/7

 देशातील श्रीमंत गावांच्या यादीत या गावाचा प्राधान्याने समावेश होतो. या गावातील लोकांचा लंडनशी विशेष संबंध आहे.  त्यातील निम्म्याहून अधिक लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात.

5/7

या  बँकांमध्ये तब्बल 7000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.  2011 मध्ये या गावाची लोकसंख्या 17000 होती, जी आता 3200 वर पोहोचली आहे.

6/7

या गावात एचडीएफसी, एसबीआय, पीएनबी, अॅक्सिस, आयसीआयसीआय , युनियन बँक आणि प्रमुख खासगी बँका मिळून तब्बल 17 बँंका आहेत. अजूनही काही बँका या गावात शाखा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. 

7/7

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात हे गाव आहे.  माधापार असे या गावाचे नाव आहे. भारतातील अनेक गावं आजही पायाभूत  सोई सुविधांपासून वंचित आहेत. अशात गावात बँक असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. मात्र, या  गावात तब्बल 17 बँंका आहेत.  जगभरातील मोठ्या बँकाना इथं आपल्या शाखा सुरु करायच्या आहेत.