Shooter arrested in Salman Khan house firing case: बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर गोंधळाचे वातावरण बघायला मिळत आहे. लॉरेंस बिश्नोईच्या टोळीच्या भीतीने बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अशातच आता मुंबई पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई टोळीतील एका सदस्याला अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे. या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसह अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. या व्यक्तीचे नाव सुखा असून तो लॉरेंस बिश्नोई टोळीचा शार्प शूटर आहे. हरियाणा आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली आहे. 


कुठे थांबला होता सुखा? 


सुखा पानिपतमधील एका हॉटेलमध्ये थांबल्याचे सांगितले जात आहे. आपली ओळख लपवण्यासाठी सुखाने त्याचे रुप देखील बदलले होते. परंतु, पोलिसांनी योग्य वेळी पानिपतला येऊन त्याला अटक केली. रिपोर्टनुसार, नवी मुंबई पोलिसांनी सुखाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सलमान खानच्या फार्म हाऊस आणि घराची देख रेक करणाऱ्यांमध्ये सुखाचा देखील समावेश होता. अटकेनंतर सुखाला नवी मुंबईत आणण्यात आले आहे. याआधीही पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई टोळीच्या 5 आरोपींना अटक केली होती. 


लॉरेंस बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर सलमानचे फार्म हाऊस


लॉरेंस बिश्नोई टोळीचे हे लोक सलमान खानच्या फार्म हाऊसच्या वाटेवर होते. त्यांनी फार्म हाऊसला देखील टार्गेट केले होते. असा खुलासा पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेला सुखा हा संपूर्ण टोळीचा सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता.


यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर आरोपींना अटक केली होती. त्यामुळे लॉरेंस बिश्नोईच्या टोळीने सलमान खानच्या जवळच्या लोकांना म्हणजेच बाबा सिद्दीकी यांना आपले टार्गेट बनवले. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मुंबईत हत्या करण्यात आली होती.