Video : नवी सुरुवात! आई- वडिलांच्या साक्षीनं स्वप्नील जोशीच्या जीवनात `ति`ची एन्ट्री
Swapnil Joshi: `डिअर झिंदगी...` म्हणज स्वप्नीलनं भावनिक पोस्ट लिहीली आणि एका बोलक्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यानं हा आनंदाचा क्षण सर्वांसमोर आणला.
Swapnil Joshi: मराठी सिनेजगत, मालिकाविश्व आणि एकंदरच मराठी कलाजगतामध्ये कमाल प्रसिद्धी मिळवणारं एक नाव म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी याचं. बहुविध कथानकांना आपल्य़ा अभिनयाच्या बळावर पेलणाऱ्या आणि तितक्याच प्रभावीपणे सादर करणाऱ्या स्वप्नील जोशीनं कैक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एक उत्तम अभिनेता असणारा हा स्वप्नील निर्मिती क्षेत्रासह इतरही भूमिकांमध्ये दिसला.
कलाविश्वामध्ये योगदान देत असताना स्वप्नीलनं तिथं त्याची कौटुंबीक जबाबदारीसुद्धा सुरेखरित्या पार पाडली आणि आता त्याच्या याच कुटुंबात एका नव्या सदस्याची भर पडली आहे. हा सदस्य कोण, हा प्रश्न तुमच्याही मनात घर करत असतानाच खुद्द स्वप्नीलनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट करत सारं चित्रच स्पष्ट केलं आहे.
आई- वडील आणि पत्नी, मुलांच्या साक्षीनं त्यानं या सदस्याचं अतिशय कृतज्ञतेनं स्वागत केलं आणि हा सदस्य म्हणजे त्याची नवी कोरी आलिशान कार 'रेंज रोव्हर डिफेंडर'. (LAND ROVER RANGE ROVER DEFENDER ). कलाक्षेत्रातील कारकिर्दीमध्ये आणि स्वत:च्या आतापर्यंतच्या जीवनात आई- वडिलांना या कारची चावी घेताना पाहणं एक वेगळीच भावना असल्याचं स्वप्नीलनं म्हटलं. हा आनंद शेअर करताना त्यानं एक छानशी पोस्ट लिहीत जगण्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
स्वप्नील लिहितो...
'डिअर झिंदगी...
आजचा दिवस अतिशय खास आहे. आपल्या प्रवासातला मैलाचा दगड आहे हा क्षण. बाबांना आपल्या नव्याकोऱ्या रेंज रोव्हर डिफेंडरच्या किल्ल्या हाती घेताना पाहून मला प्रचंड अभिमान वाटला. आपण फार पुढे आलोय, एकत्र...' आपल्या आयुष्यानं कमालीच्या आत्मविश्वासानं स्वप्नांचा पाठलाग करायचं बळ दिलं असं म्हणताना हा यशाचा डोलारा आपण कसा उभा केला हेच त्यानं शब्दात मांडलं.
हेसुद्धा वाचा : Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये?
आपण मात केलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रतीक म्हणजे ही कार... आपण उभारलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रतीक आहे ही कार, असं सांगताना ही फक्त एक नवी सुरुवात आहे पुढे आपल्यासाठी खूप काही वाढून ठेवलंय असा सकारात्मक विश्वासही त्यानं या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला. स्वप्नीलनं आयुष्याशी साधलेला हा संवाद चाहत्यांच्याही मनाचा ठाव घेऊन गेला. त्याच्या या आनंदाच्या क्षणात चाहत्यांनीही या कलाकारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.