Aarti More Purpose: सध्या मराठी चित्रपटसृष्टीतही प्रेमाचे वारे वाहू लागल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातून आता अनेकांनी आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे आणि आता ते आपल्या नव्या संसारालाही लागले आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिच्या साखरपुड्याची चर्चा होती. ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांच्या लेकीचा साखरपुडा हा थाटामाटात साजरा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची आता चर्चा रंगलेली आहे. ही तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आरती मोरे. आरती मोरेनं अनेक मराठी मालिका, चित्रपटांतून कामं केली आहेत. नुकतीच तिची 'झी मराठी' वाहिनीवरील 'लोकमान्य' ही मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. ही मालिकाही आता बंद झाली असली तरी या मालिकेची जोरात चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर कलाकार हे आपल्या प्रेमाची जाहीर कबूली देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. चाहतेही त्यांच्या या सरप्राईज पोस्टनं आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. त्यातून मग त्यांच्या या आगळ्यावेगळ्या पोस्टचीही सर्वत्र चर्चा असते. यावेळी आरतीनंही आपल्या खास व्यक्तीवर प्रेमाची कबूली दिली आहे. चला तर मग पाहुया की नक्की यावेळी तिनं लिहिलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे. सध्या तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. आरतीनं यावेळी आपल्या प्रियकराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे आणि आपल्या प्रेमाचीही कबूली दिली आहे. 'पिंकीचा विजय असो' या मालिकेतील पिंकी हिनं आपल्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 


हेही वाचा : सासरी वाद पण माहेरच्या माणसांवरील प्रेम पाहून होतंय प्रियांकाचं कौतुक, परिणीतीच्या Bday ला खास पोस्ट


''असणं हा शब्द मानवी रुपात आला तर त्याला तू तुझ्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार आहेस का?? कसं जमत तुला? कसं? Thank You वगैरे खूप formal नको बोलायला आता मी! आय लव्ह यू जानेमन, वाढदिवसाच्या शुभेच्छा'' अशी पोस्ट तिनं शेअर केली आहे आणि सोबतच तिनं आपला आणि त्याचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. आरती मोरे ही गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय पाटीलला डेट करते आहे. तोही चित्रपटसृष्टीशी संलग्न आहे. दशमी क्रिएशन्सच्या माध्यमातून तो सक्रिय आहे. ते दोघं कॉलेजपासूनचे खास मित्र आहेत असेही कळते आहे. यावेळी आरतीनं त्याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. 



आरतीनं 'जय मल्हार', 'दिल दोस्ती दोबारा', 'गुलमोहर', 'अस्मिता' अशा लोकप्रिय नाटकांतून काम केली आहे. 'दादा एक गुडन्यूज आहे' या नाटकातूनही महत्त्वाची भुमिका साकारली आहे.