Parineeti Chopra Birthday Priyanka Chopra: परिणिती चोप्राचा आज 35 वा वाढदिवस आहे. तिचे अनेक चित्रपट हे लोकप्रिय आहेत. त्यातून आता या वर्षी तिचं लग्नही थाटात पार पडलं आहे. 'आप'चे खासदार राघव चड्ढा यांचे आणि परिणिती चोप्राचे थाटामाटात 24 सप्टेंबरला लग्न पार पडलं. यावेळी प्रियांका चोप्रा या लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकली नव्हती. परंतु आपल्या बहिणीसाठी, तिच्या या खास दिवसासाठी प्रियांकानं परिणितीसाठी खास पोस्ट शेअर केली होती.
यावेळी तिनं इन्स्टाग्राम स्टोरीतून परिणितीसाठी खास इच्छा व्यक्त केली होती. सध्या प्रियांका चोप्राच्या सासरी मात्र घरगुती वाद सुरू आहेत. तिच्या घरी तिच्या दीराचा घटस्फोट होणार असल्याकारणानं ती सध्या त्यात व्यस्त आहे. त्यामुळे ती परिणितीच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. आज परिणिती चोप्राचा वाढदिवसही आहे. तेव्हा आपल्या लाडक्या चुलत बहीणीसाठी तिनं खास पोस्ट शेअर केली आहे.
13 मे 2023 रोजी राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा संपन्न झाला होता. तेव्हा प्रियांका चोप्रानं विशेष उपस्थिती लावली होती. प्रियांका भारतात आल्यावर तिच्या चाहत्यांनाही फार आनंद तेव्हा झाला होता. राघव आणि परिणितीच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर त्यांच्या शाही लग्नसोहळ्याच्या फोटोंना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. आता सोशल मीडियाचे माध्यम असल्यानं सर्वत्र हे फोटो सहज पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एव्हाना लग्नानंतरचेही अनेक फोटो परिणितीचे आणि राघव चड्ढा यांचे व्हायरल झाले आहेत. यावेळी ते दोघं आपल्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे.
हेही वाचा : VIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...

यावेळी तिनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'हॅप्पी बर्थडे टिशा. आज काय, कायमच तुझ्या आजूबाजूला फक्त आनंद आणि प्रेम बहरत राहो. हिच इच्छा व्यक्त करते आहे.' सध्या तिची ही स्टोरी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाली होती. लग्नापुर्वी परिणिती चोप्राचा 'उंचाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 2020 मध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना परिणिती चोप्राला या इंडस्ट्रीत येऊन 10 वर्षे पुर्ण झाली होती. तेव्हा यासाठी त्यांनी त्या चित्रपटाच्या सेटवर सेलिब्रेशनही केले होते. प्रियांका चोप्राचीही 'सिटाडेल' ही वेबसरिज प्रचंड गाजली होती.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.