मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहेत. सध्या 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' या ऐतिहासिक मालिकेत ऐश्वर्या नारकर या दिसत आहेत. ऐश्वर्या या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर त्याचं मत मांडलं आहे. 


आणखी वाचा : ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ समोर येताच नेटकरी म्हणतात, 'किती तो Attitude...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाल्या, 'सोयरे सकळ' नाटकानंतर इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार केलं. सुरुवातीला मी हातात असतील तसे फोटो अपलोड करत होते. आता काय झालंय, की 'कोलॅब'मध्ये मी बऱ्याच गोष्टी करते, विशेषत: साड्यांसाठी. मुळात साडी मला अतिशय आवडते. ती मला छान कॅरीही करता येते. कोलॅबमुळे साड्यांचे फोटोशूट होतात. श्रद्धा, आशय, श्रुती, दीपाली यांच्याबरोबर मी हे फोटोशूट केले. एका वेळी फोटोशूट केलं की किमान ५०० तरी फोटो असतात. मग त्यापैकी निवडक मी अपलोड करते. सोशल मीडियावर ठरवून सक्रिय राहणं असं काही त्यात नाही. तुम्ही नीट पाहिलं तर माझ्या पोस्ट कुठल्याही प्रोजेक्टसंदर्भातल्या नसतात किंवा काही खासगीही नसतात.' 


आणखी वाचा : 'जर तू जीन्स घातलीस तर...', राज कपूर यांचं बोलणं ऐकून मंदाकिनी थांबलीच...



आणखी वाचा : 'त्या' तीन सेकंदांनी बदललं ऐश्वर्या रायचं आयुष्य, एकदा तुम्हीही पाहा कुठे नशीब फळफळलं 


पुढे बोलताना ऐश्वर्या म्हणाली, 'मध्यंतरी मी काही रील्स नऊवारीत केले होते. 1-2 रील करताना त्यात मी डोळा मारल्याचं दाखवलं होतं. तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं, हे तुमच्या वयाला शोभतं का? अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. तुम्हाला जर एखादी गोष्ट खटकत असेल तर अनफॉलो करा, इतकं सोपं आहे. ते जबरदस्ती पाहण्याची आवश्यकता नाही. हे कुठेतरी थांबायला हवी. सोशल मीडियाचा अशा पद्धतीनं कुणीही वापर करू नये. फार झालं तर मी अशा लोकांना सरळ ब्लॉक करून टाकते.' (actress aishwarya narkar on trolling says we should stop this)