स्वत:च्या अभिनयाची आलियाला वाटतेय लाज, तरीही तिच्या मुलीने `हा` चित्रपट पाहावा अशी तिची इच्छा
आलिया भट्ट सध्या तिच्या `जिगरा` चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने सांगितले की तिला एका चित्रपटाबद्दल लाज वाटते. तरीही तिच्या मुलीने तो चित्रपट पाहावा असं तिला वाटत आहे.
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आलिया भट्टने करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीच्या अभिनयामध्ये मोठा बदल झाला. सध्या आलिया भट्ट तिच्या 'जिगरा' चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आलियासोबत या चित्रपटात वेदांग रैना देखील दिसत आहे. अभिनेत्रीचा दमदार अभिनय आणि अॅक्शन या चित्रपटात बघायला मिळत आहे. 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
आलियाने IMDb ला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे की, राहा मोठी झाल्यावर तिला कोणता चित्रपट दाखवू इच्छिते. या प्रश्नावर आलिया भट्ट म्हणाली की, राहाला मोठी झाल्यावर 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट दाखवणार आहे. कारण 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट तरुणांसाठीचा चित्रपट असल्याने तो लोकांनी पाहावा अशी माझी इच्छा आहे.
स्वत:च्या अभिनयाबद्दल काय म्हणाली आलिया?
'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट खूपच मजेदार आहे. त्यामधील गाणी देखील लहान मुले पाहू शकतात. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा चित्रपट माझा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात माझा अभिनय काही खास नव्हता. पण तो एक मजेदार अनुभव होता आणि राहा याचा आनंद घेईल असे मला वाटते. रणबीर कपूरच्या एका चित्रपटाबद्दल विचारले असता ती म्हणाली की राहा हिला दाखवू इचछिते. तेव्हा आलिया म्हणाली बर्फी. 'बर्फी' हा मुलांसाठी एक उत्तम चित्रपट आहे. असं आलिया भट्टचं मत आहे.
दुसऱ्या मुलाचे प्लानिंग करतेय आलिया?
आयुष्यात पुढे काय करायच याबद्दल प्रश्न विचारला असता आलिया भट्ट म्हणाली की मला अजून काही चित्रपटांमध्ये काम करायचं आहे. एक अभिनेत्री आणि निर्माता म्हणून अजून खूप काम करायचं आहे. त्यासोबत अभिनेत्री म्हणाली की ती रणबीर कपूरसोबत दुसऱ्या मुलाचे प्लानिंग देखील करणार आहे.
आलिया भट्ट आणि वेदांग रैनाच्या 'जिगरा' चित्रपटात एका बहिणीची कथा आहे. जी आपल्या धाकट्या भावाच्या रक्षणासाठी काहीही करायला तयार आहे. कठीण प्रसंगात देखील ती आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते.