मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलवर पुन्हा एकदा फसवणूकीचा आरोप लावण्यात आला आहे. एका चित्रपट निर्मात्याने अमीषा आणि तिच्या बिझनेस पार्टनरवर २.५ कोटी रूपये परत न केल्याचा आरोप लावला आहे. निर्मात्याने अमीषा आणि कुणालवर फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमीषा आणि कुणालने 'देसी मॅजिक' चित्रपटासाठी निर्माता अजय कुमार सिंहकडून २.५ कोटी रूपये घेतले होते. चित्रपटाचं चित्रिकरण २०१३ साली सुरू करण्यात आलं होतं. अमीषानं चित्रपट २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं होतं. या चित्रपटातून मोठा फायदा होणार असून अमीषाने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह संपूर्ण पैसे परत देणार असल्याचं अजय कुमार यांनी सांगितलं.


अजय यांनी हा चित्रपट अद्याप प्रदर्शित न झाल्याचं सागितलं. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ज्यावेळी अमीषाला विचारण्यात आलं त्यावेळी तिने ३ कोटी रूपयांचा चेक दिला. परंतु हा चेक बाउन्स झाला. चेक बाउन्सबद्दल अमीषाला सांगण्यात आलं त्यावेळी अमीषाने पैसे न देण्याचं सांगत, प्रसिद्ध व्यक्तींसोबतचे फोटो दाखवत धमकावलं असल्याचं निर्मात्याने सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी मला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे परंतु याबाबत अधिक कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं अजय कुमार सिंह यांनी म्हटलं आहे.