मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकतेच बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले. अंकिता लोखंडेची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रांती आहे. अंकिता लोखंडे हिने नववधूप्रमाणे सजवून कुटुंबियांसोबत हा सण साजरा केला. ज्याचे सुंदर फोटो तिने रीलच्या रुपात चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये अंकिता दागिने घालून पतंग उडवताना आणि धनुष्यबाण घेऊन कुंपण चालवताना दिसत आहे. अंकिता लोखंडेने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. फोटोमध्ये कुटुंबासोबत सुंदर पोज देणारी अंकिताचे हे सुंदर फोटो सोशल मीडियावर आगीसारखी पसरले आहेत.


अंकिताने साज श्रृंगार करुन आपली मकर संक्रांत आणखीनंच स्पेशल बनवली आहे. तिच्या कुटुंबियांनी देखील अंकिताची पहिली मकर संक्रांत स्पेशल बनवण्यासाठी खास मेहनत घेतल्याचं दिसून आलं. घरात छान सजावट करण्यात आली आहे. बँकग्राऊडला पतंग लावून घर सजवण्यात आलं आहे,


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंकिता लोखंडेच्या लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने पैठणीसोबत भारी दागिने कॅरी केले आहेत. अभिनेत्री मराठी लूक खूप एन्जॉय करत आहे. अंकिता लोखंडेने हे सुंदर फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले – कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास व, आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा ! हैप्पी मकर संक्रांति....मिस्टर आणि मिसेस जैन यांच्याकडून..


अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते सतत कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.