Bhagyashree Fitness to Health Tips : ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सगळ्यांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री भाग्यश्री आजही चर्चेत असते. भाग्यश्री वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट आहे. भाग्यश्री ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आता सोशल मीडियावर तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तिनं अनेक फिटनेस टीप दिल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे क्रॅब वॉकचे फिटनेस टिप्स देताना दिसली. आता तिनं एक व्हिडीओ पोस्ट केला असून फायद्याविषयी सांगितलं आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला फिटनेस कोच म्हणायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाग्यश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाग्यश्री ही फिटनेस टिप्स देताना दिसते. आता तिनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती क्रॅब वॉकचे फायदे सांगितलं. भाग्यश्रीनं सांगितलं की या वॉकनं पोटाच्या खालच्या भागात सुधारणा होत आहे आणि हातात ताकद येण्यास मदत होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


भाग्यश्रीनं तिच्या या व्हिडीओत या वर्कआऊटचे फायदे काय आहेत के सांगताना दिसली. ‘क्रॅब वॉक’ हा एक अ‍ॅनिमल फ्लो आहे. व्हिडीओमध्ये भाग्यश्री सांगताना दिसते की वजन कमी करण्यासाठी हे लाभकारी आहे. व्हिडीओमध्ये भाग्यश्री पुढे म्हणाली की 'सगळ्यांना माहित आहे की खेकडा हा सरळ चालू शकत नाही, पण हे देखील सत्य आहे की खेकड्याचं पोट हे मोठं नसतं. क्रॅब वॉक केल्यानं कोर स्ट्रेंथ आणि आर्म स्ट्रेंथ वाढते. त्यामुळे ग्लूट्स देखील मजबूत होतात, तर चला मंगळवार टिप्समध्ये क्रॅब वॉक शिकूया.'


त्यानंतर पुढे भाग्यश्रीनं सांगितलं की आज मंगळवारच्या टिप्सचा हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. हा हॅमस्ट्रिंगला लवचीक बनतं. तर व्हिडीओला शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की अ‍ॅनिमल फ्लो - आज क्रॅब वॉक करण्याचा प्रयत्न करा. कोर टाईट करण्यासाठी सगळ्यात उत्तम हा व्यायाम. दरम्यान, हा व्यायाम फक्त ट्रेनरच्या उपस्थित करण्याचा सल्ला भाग्यश्रीनं दिला आहे. कारण ते तुम्हाला या संबंधीत व्यवस्थित माहिती देऊ शकतात आणि त्यानं तुम्हाला दुखापत होणार नाही. 


हेही वाचा : कुटुंबासोबत डिनरवर गेला अक्षय कुमार, मात्र चर्चा सोबत दिसलेल्या मुलीची; 'ती' आहे तरी कोण?


कामाविषयी बोलायचं झालं तर भाग्यक्षी गेल्यावर्षी 2023 मध्ये मिखिल मुसले दिग्दर्शित ‘सजनी शिंदे का वायरल व्हिडीओ’ मध्ये दिसली होती. त्यात निम्रत कौर, राधिका मदान आणि सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.