वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण; आज 120 कोटींची मालकीण आहे `ही` अभिनेत्री
Debut at the Age of 15 now has 120cr Networth : या अभिनेत्रीनं वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आज तिची एकून नेटवर्थ ही 120 कोटींची आहे.
Tamannaah Bhatia : एक कलाकार होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला खूप मेहनत घ्यावी लागते. कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही असं म्हणत काही कलाकार सोडून देतात. पण त्याच ठिकाणी जे लोक सतत मेहनत करतात ते नक्कीच यशस्वी होतात. अशीच एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीनं तिची हिंमत्त सोडली नाही आणि आज ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती दुसरी कोणी नसून तमन्ना भाटिया आहे.
तमन्ना भाटियाचा आज 21 डिसेंबर रोजी 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तमन्ना यशस्वी अभिनेत्री झाली आणि वयाच्या 16 व्या वर्षी तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तमन्नानं तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. तिनं फक्त तिथे काम केलं नाही तर त्यासोबत प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान देखील निर्माण केलं आहे. तिच्या लाईफस्टाईल आणि खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असायची. तमन्ना एका चित्रपटासाठी आज 8-10 कोटी मानधन घेते.
तमन्नानं तिचं शालेय शिक्षण हे कपूर एज्युकेशन ट्रस्ट स्कूल येथून पूर्ण केलं. वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या शाळेतील एका कार्यक्रमात तिनं भाग घेतला होता. त्यावेळीच तिला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी ऑफर मिळाली. त्यानंतर वर्षभर ती मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होती. इतकंच नाही तर तिनं अभिजीत सावंतच्या ‘लफ्जों में’ या अल्बममध्ये देखील काम केलं आहे. हा अल्बम 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. काही काळ मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी 'चांद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून तमन्नानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर तमन्नानं 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्री' या तेलगू चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2006 मध्ये तिनं 'केडी' या तमिळ चित्रपटामध्ये काम केलं आणि त्यानंतर तमन्नानं मागे वळून पाहिलं नाही.
2013 मध्ये तमन्नानं 'हिम्मतवाला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला परंतू तमन्नानं आशा सोडली नाही आणि तिनं हिंदी चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा तिचं नशिब आजमावण्यास सुरुवात केली. मग तमन्ना अक्षय कुमारच्या 'एंटरटेनमेंट' या चित्रपटात दिसली. तमन्नाला खरी लोकप्रियता ही 'बाहुबली' या चित्रपटातून मिळाली आणि त्यानंतर सगळ्याच दिग्दर्शकांना तिच्याशी काम करायचं होतं.
हेही वाचा : VIDEO : सोहेल खानच्या Birthday पार्टीत शूरानं नाही तर बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
GQ च्या रिपोर्टनुसार, तमन्ना ही 120 कोटींची मालकिन आहे. तर रिपोर्ट्सनुसार 'बाहुबली' या चित्रपटासाठी 5 कोटी मानधन घेतलं होतं. तर ती एका जाहिरातीसाठी किंवा प्रमोशनसाठी 7-8 कोटी मानधन घेते. 2015 मध्ये तमन्नानं व्हाइट अॅन्ड गोल्ड नावानं एक ज्वेरली स्टोर सुरु केलं. रिपोर्ट्सनुसार, जगातील सगळ्यात महागड्या हिऱ्यांमधील पाचव्या क्रमांकाचा हिरा तमन्नाकडे असून त्याची किंमत ही 2 कोटी आहे. हा हिरा तिला राम चरणची पत्नी उपासना कोनिडेलानं भेट केला होता.