Bobby Deol's Wife Tanya : बॉलिवूड अभिनेता सोहेल खाननं काल शुक्रवारी 20 डिसेंबर रोजी त्याचा 54 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून त्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. वांद्रे मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये त्यानं या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सलमान खान, अरबाज खान आणि त्याची लेक शूरा खान, अरबाज खान, अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खान, आयुष शर्मा आणि जवळचे मित्र देखील यावेळी होते.
एकीकडे सेलिब्रिटी सोहेलला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले, तर काही सेलिब्रिटींनी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत आलेल्या सेलिब्रिटींमध्ये जर कोणी सगळ्यांच लक्ष वेधलं असेल तर ती सोहेलची वहिणी शूरा नाही तर मित्र आणि अभिनेता बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं इन्स्टाग्रामवर बॉबी आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बॉबी देओलनं काळ्या रंगाचा ट्रॅक सूट परिधान केला आहे तर त्याची पत्नीनं ब्लेझर आणि व्हाईट शॉट्स परिधान केली आहे. बॉबीची पत्नी तान्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
तान्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एक नेटकरी म्हणाला, बॉबी देओलची पत्नी सुंदर दिसते. दुसरा नेटकरी म्हणाला, तान्या कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
हेही वाचा : नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना; आराध्याची स्तुती करत ब्लॉगमध्ये म्हणाले...
अनेक सेलब्रिटींनी सोहेलला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील शेट्टीनं सोशल मीडियावर सोहेलसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सुनील शेट्टी आणि सोहेल हे ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खास मित्र आहेत. तर खास मित्राच्या वाढदिवसानिमित्तानं त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हटके शुभेच्छा दिल्या. या दोघांनी एका सगळ्यात आधी 'लकीर-फॉरबिडन लाइन्स' आणि त्यानंतर 'फाइट क्लब: मेंबर्स ओनली' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातून त्या दोघांची मैत्री किती खास आहे ते पाहायला मिळालं.