Divyanka Tripathi met an Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता तिच्या अपघाताच्या बातमीनं सगळ्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिव्यांकाचा अपघात झाला होता आणि तिनं याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल 18 एप्रिल रोजी दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला आणि तिचा पती विवेक दहियानं तिच्या चाहत्यांना ही बातमी दिली होती. दिव्यांकाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पीआर टीमनं जास्त माहिती दिली नाही, पण त्यांनी खुलासा केला की दिव्यांकाच्या हाताची दोन हाडं तुटली आहेत आणि आता तिच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. विवेकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून तिच्या एक्स्रेचा फोटो शेअर केला आहे. 



दिव्यांकाच्या अपघाताविषयी कळताच विवेक दहियानं त्याचं लाइव्ह सेशन कॅन्सल केलं आणि तिच्याजवळ गेला. दिव्यांकाच्या एक्स्रेचा फोटो शेअर करत विवेक दहियानं कॅप्शन दिलं की "आम्हाला ही बातमी देताना दु:ख होतं आहे की विवेकचं उद्या होणार असलेलं लाइव्ह सेशन पुढची कोणतीही अपडेट येई पर्यंत कॅन्सल करण्यात आलं आहे. काही तासांपूर्वी दिव्यांकाचा अपघात झाला होता आणि ती आता मेडिकल केयरमध्ये आहे. ती ठिक झाल्यानंतर विवेक हे सेशन पुढे घेईल. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या सगळ्यांचे आभार आणि दिव्यांका लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी आमच्यासोबत कृपया प्रार्थना करा. विवेक लवकरच तुमच्या सगळ्यांशी संपर्क करण्यासाठी उत्साही आहे."


हेही वाचा : 'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...


दिव्यांका त्रिपाठीनं  'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेत विद्या ही भूमिका साकारली होती. तर 'ये है मोहब्बतें' मध्ये तिनं 'डॉक्टर इशिता भल्ला' ही भूमिका साकारली. खरंतर दिव्यांकाला इशिता म्हणून जास्त लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या सेटवर दिव्यांकाची भेट विवेक दहियाशी झाली. त्यानंतर त्यांची मैत्री झाली, मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. तर त्यानंतर दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 2016 मध्ये सप्तपदी घेतल्या होत्या. दिव्यांका आणि विवेक हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ते दोघं एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात.