Genelia Deshmukh Vat Pournima 2023: काल वटपौर्णमेचा सण उत्साहात साजरा झाला त्यामुळे सगळीकडे चर्चा होती ती वटपौर्णिमा आणि त्याच्या उपवासाची. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही वटपौर्णमेचा सण हा आनंदानं साजरा केला. त्यामुळे सेलिब्रेटींनीही आपले वटपौर्णिमेचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी सगळ्यांमध्ये लक्ष वेधले ते जेनेलियानं. अभिनेत्री जेनेलिया देशमुखनंही यावर्षीची वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला होता. तिनं यावेळी आपल्या वटपौर्णिमेच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामुळे सगळीकडे तिच्या वटपौर्णिमेच्या उपवासाची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिनं इन्टाग्रामवरून आपल्या वटपौर्णिमेचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती वटपौर्णिमेची पूजा करताना दिसते आहे. यावेळी तिनं घरच्या घरीच वटपौर्णिमा साजरी केल्याचे दिसते आहे. तिनं इन्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, वटपौर्णिमा. रितेशला टॅग करत ती म्हणाली, ''मला हाच आयुष्यभर हवा.'' सध्या तिच्या या फोटोनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये ती पाठमोरी दिसते आहे. दरवर्षी जेनेलिया वटपौर्णिमेची पूजा करताना दिसते त्यामुळे दरवर्षी तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. यंदाही तिनं जोरात वटपौर्णिमा साजरी केली आहे. 


 


यावेळी रितेशनंही जेनेलियाचा फोटो रिशेअर केला आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, लव्ह यू बायको. यावेळी जेनेलिया ही घरातच वडाच्या झाडाची पूजा करताना दिसली यावेळी तिनं वडाची फांदी आणली होती. यावेळी तिनं बॅगराऊंडला 'वेड' चित्रपटातील 'सुख कळले' हे गाणं लावलं होतं. यंदा मराठी सेलिब्रेटींनीही वटपौर्णिमा साजरी केली आहे.


हेही वाचा >>>> लेकीचा चेहरा दाखवायला एवढी का लपवाछपवी? राहासह स्पॉट झाल्यावर आलियाला नेटकऱ्यांचा सवाल


त्यांनीही आपले फोटोज हे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या फोटोज एकच चर्चा रंगली होती. सध्या जेनेलियाच्या या फोटोला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. वटपौर्णिमेच्या सणाला वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि वडाच्या झाडाला दोरा गुंडाळला जातो. त्याचबरोबर आपल्याला पुढील सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते. 



जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांच्या 'वेड' हा चित्रपट मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. जेनेलियानं या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यामुळे यावेळी जेनेलियाच्या अभिनयाचेही कौतुक करण्यात आले.