...अखेर नेहा पेंडसेने करुन दाखवलं ! हा व्हिडीओ पाहीलात का ?
काही दिवसांपुर्वी अशक्य वाटणारी स्टेप नेहाने अथक मेहनत आणि सातत्याने करुन दाखवली
मुंबई : फिटनेसच्या बाबतीत अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमी सजग असते. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फिटनेसचे फंडे नेहमी शेअर करत असते. नेहाचा फिटनेस फंडा फॉलो करणारा खूप मोठा चाहता वर्ग तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आहे. प्रत्येकजण नेहाच्या नव्या फिटनेस व्हिडीओची वाट पाहत असतो. नुकताच नेहाने एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामध्ये ती योगा करताना दिसतेय. काही दिवसांपुर्वी अशक्य वाटणारी स्टेप नेहाने अथक मेहनत आणि सातत्याने करुन दाखवली आहे. यासंदर्भात नेहाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील लिहीली आहे.
हे वाचा : 'शार्दुलराव आहेत बरे...' लग्नात नेहाचा भन्नाट उखाणा
एक पाऊल पुढे...योगा करावं असं नेहमीच मनातून वाटतं राहायच..पण कुठेतरी राहुन जात होतं. पण आता लॉकडाऊनमध्ये घरी अडकल्याचा स्वत:साठी सकारात्मक वापर करुन घेतल्याचे नेहा सांगते. योगा करणे खूप कठीण गोष्ट आहे. त्यातही काही दिवसांपासून टेनिस एल्बो आणि स्नायूंचा त्रासही जाणवत होता. पण व्यायाम यातून बरे होऊन व्यायाम करण्याचा आनंद वेगळाच असतो.
नियमित सरावामुळे योगामध्ये एक पाऊल पुढे जाता आल्याचा आनंद नेहाने व्हिडीओ शेयर करुन व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच सोशल मीडियावरून चर्चेत असते. नेहा 'बिग बॉस १२' या रिअॅलिटी शोचा भाग होती. या शो दरम्यान नेहा अनेकांची आवडती खेळाडू ठरली होती. 'बिग बॉस १२' शो संपल्यानंतर अजूनही तिला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नेहाचे इन्स्टाग्रामवर मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. नेहा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत तिचा विवाह झाला. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत राहीले.
नेहाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले तिचे फोटो, जीममधील स्ट्रेचिंगचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात.
हे वाचा : पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेने फटकारलं
मुंबईत जन्मलेली नेहा शुभांगी पेंडसे यांची मुलगी आहे. ३३ वर्षीय नेहाने आतापर्यंत मराठी, तमिळ, तेलुगू, मल्ल्याळम तसंच हिंदी चित्रपटांतून काम केलं आहे. टेलिव्हिजन शो 'मे आय कम इन?'मधून नेहाने साकारलेल्या 'संजना' या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली. 'भाग्यलक्ष्मी' या मराठी शोमधूनही तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. २०१४ साली आलेल्या 'प्रेमसाथी कमिंग सून'साठी तिने तब्बल १५ किलो वजन कमी केलं होतं. काही दिवसांपूर्वी नेहाने केलेला पोल डान्सही चांगलाच व्हायरल झाला होता.
नेहाने 'हसरतें', 'कॉमेडी दंगल', 'फॅमेली टाईम विथ कपिल शर्मा', 'इंटरटेनमेंट की रात', यासारख्या शोमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'दाग: द फायर', 'देवदास', 'स्वामी' या चित्रपटातूनही तिने काम केलं आहे. ९०च्या दशकांत नेहाने बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे.
नेहा पेंडसेने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेतील चित्रपटांसह मराठी चित्रपटातही कामं केलं आहे. 'प्यार कोई खेल नहीं', 'दाग: द फायर', 'दीवाने' या बॉलिवूड चित्रपटातूनही तिने भूमिका साकारली आहे.