'शार्दुलराव आहेत बरे...' लग्नात नेहाचा भन्नाट उखाणा

प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत तिचा विवाह संपन्न झाला.

Updated: Jan 5, 2020, 08:36 PM IST
'शार्दुलराव आहेत बरे...' लग्नात नेहाचा भन्नाट उखाणा

मुंबई : गेल्या कही दिवसांपासून अभिनेत्री नेहा पेंडसेच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. अखेर आज ती विवाह बंधनात अडकली आहे. प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत तिचा विवाह संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. तिचा साखरपुड़ासुद्धा असाच खासगी पद्धतीने पार पडला होता. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम तिच्या लग्नाच्या आणि लग्नसोहळ्यापूर्वीच्या विधींचे फोटो शेअर करत होती. 

तर आता लग्नानंतर तिने घेतलेला उखाणा व्हायरल होत आहे. 'चांदिच्या ताटात फणसाचे गरे.. शार्दुलराव आहेत बरे.. वागतील तेव्हा खरे..' असा उखाणा तिने घेतला. उखाणा घेताना ती फार आनंदी दिसत होती. अभिनेता अभिजीत खांडकेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहाचा हा गंमतीदार उखाणा पोस्ट केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

नवरीचा उखाणा #yaarkishadi #shardulnehha #pune #maharastrianwedding

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

लग्नासोहळ्यापूर्वी रंगलेल्या विधींमध्ये देखील नेहा फार सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या काही फोटोंमध्ये नेहा लग्नाआधीच्या या विधींमध्ये अतिशय आनंदात सहभागी होताना दिसत होती. ज्यामध्ये तिने लाल रंगाची किनार असणारी सुरेख साडी नेसली होती. 

वर्षभरात सेलिब्रिटी विश्वात लग्नसराईचे वारे चांगल्याच वेगाने वाहत असल्याचं पाहायला मिळालं. अगदी यंदाच्या वर्षी अखेरच्या दिवसापर्यंत हे वातावरण असंच कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. टेलिव्हिजन विश्वात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधील काही कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आज विवाह बेडीत अडकली.