Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य कलाजगत आणि हिंदी चित्रपट विश्वामध्ये गेल्या काही काळापासून काही South Celebs ची चर्चासुद्धा पाहायला मिळाली. यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री समांथा रुथ प्रभू. रुपेरी पडदा गाजवणारी आणि अनेकांवर आपल्या रुपानं भुरळ पाडणारी ही अभिनेत्री कारकिर्दीत यशाच्या शिखरावर पोहोचली असली तरीही खासगी आयुष्यात मात्र तिला आव्हानात्मक प्रसांगांनाच सामोरं जावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर झालेला घटस्फोट, मायोसायटिस आणि अपयशी चित्रपट या साऱ्यामुळं ती खचली. खुद्द समांथानंच एका मुलाखतीमध्ये याबात आपलं मन मोकळं केलं. जीवनातील या वाईट वळणांमध्ये चाहत्यांचा मोठा आधार मिळाला असंही ती न विसरता म्हणाली. 


एक अपयशी लग्न आणि... 


'जेव्हा मी एका अपयशी लग्नातील वाईटातल्या वाईट वळणावर पोहोचले होते तेव्हाच माझं आरोग्य आणि माझ्या कामावरही या साऱ्याचा परिणाम होत गेला. तिन्ही बाजूंनी संकटं ओढावली होती. त्याचवेळी मी अशा कलाकारांविषयी वाचलं ज्यांनी अशा आजारपणांना तोंड दिलं आणि दमदार पुनरागमनही केलं, ट्रोलिंग आणि नैराश्याचा सामना केला. त्यांच्याविषयी वाचून मला प्रेरणा मिळाली. त्यांना हे सर्व शक्य झालं तर मलाही शक्य होईलच हे माझ्या लक्षात आलं'. 


हेसुदधा वाचा : 'मी विराटशी बोलत नाही... तो स्वत:ला...'; युवराज सिंगच्या वक्तव्यानं वळल्या नजरा 


देशातील जनतेच्या आवडीची अभिनेत्री असणं ही एक अद्वितीय गोष्ट असली तरीही त्यासोबत तुमच्याकडे एक जबाबदारीसुद्धा येते. प्रामाणिक राहण्याची जबाबदारी. त्यावेळी तुम्ही तुमच्याविषयी सर्वकाही खरं बोलणं अपेक्षित असतं. माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ जाहीरपणे सर्वांनीच पाहिला याचं मला अजिबात दु:ख नाही. उलटपक्षी त्यामुळं मला बळच मिळालं, असं म्हणत आपल्याकडे जे काही आहे त्यासोबतच परिस्थितीशी लढण्यासाठी आपण तयार असल्याचं ती म्हणाली. 


अभिनेता नागा चैतन्य याच्याशी समंथ्यानं अतिशय दिमाखदार सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर घटस्फोटानं या नात्याला कायमस्वरुपी पूर्णविराम दिला.