मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री तब्बू आपले वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धी आणि बातम्यांपासून दूर ठेवते. तब्बूने वयाच्या पंधराव्या वर्षी 'हम नौजवान' (1985) या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने देव आनंदच्या मुलीची भूमिका साकारली होती. मुख्य अभिनेत्री म्हणून तिचा पहिला हिंदी चित्रपट 'पहला पहला प्यार' होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 50 व्या वर्षीही तब्बू तिच्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचे लक्षवेधून घेत असते.  तब्बूने अजून लग्न केले नाही आणि तिने तिच्या मेहनतीने कोटींचे साम्राज्य उभे केले आहे. एका रिपोर्टनुसार, तब्बू नेट वर्थची एकूण संपत्ती 22 कोटी रुपये आहे. दर महिन्याला ती 25 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते आणि एका वर्षात तिचे उत्पन्न 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असते.



ट्रेड अ‍ॅनालिस्टच्या मते, तब्बू एका चित्रपटासाठी 2-4 कोटी रुपये मानधन घेते. ब्रँड अॅण्डोर्समेंटसाठी अभिनेत्री मोठ्या प्रमाणात शुल्क आकारते. हैदराबादमध्ये तब्बूची अतिशय आलिशान घरं आहेत. तसेच, तिची मुंबईत देखील मोठी घरे आहेत. अभिनेत्रीच्या गॅरेजमध्ये ऑडी क्यू 7 सारखी वाहने देखील आहेत.


 तब्बूने माचिस, विरासत, हू तू तू, अस्तित्व, चांदनी बार, दे दे प्यार दे, दृष्यम आणि हैदर असे अनेक चित्रपट केले आहेत. ज्यासाठी तिला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांचीही खूप वाहवा मिळाली.