Adipurush Box Office collection day 6 : गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपट चर्चेत असण्याचं कारण त्याचे डायलॉग्स आणि व्हिएफेक्स आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतला. दरम्यान, चित्रपटाच्या कमाई विषयी बोलायचे झालं तर चित्रपट पाहण्यासाठी उस्तुक असलेल्या अनेक प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंग केली होती. त्यातून चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मात्र, आता बॉक्स ऑफिस चित्रपटाच्या कमाईचा आकडा घसरत चालला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या तीन दिवसात चांगलीच कमाई केली. चित्रपटानं अनेक रेकॉर्डही मोडले. पण प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसापासून चित्रपटाच्या कमाईत घसरन झाली आहे. Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, चौथ्या दिवशी चित्रपटानं फक्त 16 कोटी रुपयांची कमाई केली. तर पाचव्या दिवशी 10 कोटी रुपये कमावले आणि सहाव्या दिवशी तर चित्रपटानं 7.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपटाची एकूण कमाईचा आकडा हा 255 कोटींच्या पार गेला आहे. तर वर्ल्ड वाइड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 395 कोटींचा आकडा पार केला आहे. 



हेही वाचा : "...तर तुझे बांधव मुंडकं छाटतील", रावणाच्या भूमिकेवरून मुकेश खन्ना यांचे Saif Ali Khan ला खडे बोल


दरम्यान, 'आदिपुरुष' हा चित्रपट बनवत असताना त्यासाठी 600 कोटींचा खर्च करण्यात आला तर अशात आता हा चित्रपट तितके पैसे तरी कमवू शकेल का असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे. इतकंच काय तर आता दुसरीकडे 'आदिपुरुष' 3D मध्ये पाहण्यासाठी फक्त 150 रुपये आकारले जात आहेत. तुम्हालाही हे वाचून नक्कीच आश्चर्य झाले असेल पण याची अधिकृत माहिती टीसीरिजच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. पण इतकी मोठी ऑफर ही फक्त 22 जून आणि 23 जून या दोन दिवसांसाठी आहे. पण त्यातही हा चित्रपट जर तुम्ही आंध्र प्रदेश, तेलंगना, केरळ आणि तमिळनाडूत पाहणार असाल तर तुम्हाला ही ऑफर लागू नाही आहे. तुम्हाला 3D मध्ये हा चित्रपट 150 रुपयात पाहता येणार नाही. 



दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात हनुमानचे डायलॉग्स आहेत. खरंतर हे बदललेले डायलॉग्स आहेत. हे डायलॉग्स चित्रपट एडिट करण्यात आल्या नंतरचे आहेत. सुरुवातीला व्हायरल झालेल्या डायलॉगमध्ये 'कपड़ा तेरे बाप का...तो जलेगी भी तेरे बाप की' असं हनुमान बोलत असल्याचे दिसत होतं. आता त्याजागी 'कपड़ा तेरी लंका का ...तो जलेगी भी तेरी लंका' असा करण्यात आला आहे.