बॉलिवूडमध्ये Prabhas च्या Success मागे `या` मराठमोळ्या कलाकाराचा हात!
जाणून घ्या, कोण आहे तो मराठमोळा अभिनेता...
मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास सध्या 'आदिपुरुष' (Adipurush) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास भगवान श्री राम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला रामच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक असताना, अभिनेता शरद केळकर प्रभासच्या 'आवाज'च्या भूमिकेत परतल्यानं त्यांना आनंद झाला आहे. शरद केळकरच्या आवाजाने प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवलं. पण नंतर प्रभासनं त्याच्या सर्व हिंदी चित्रपटांमध्ये ना शरद केळकर किंवा इतर कोणत्याही अभिनेत्याकडून डबिंग केलं नाही. परिणामी प्रभासचे चित्रपट फ्लॉप झाले. प्रभासला इच्छा असूनही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवता आलं नाही. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्मात्यांना पुन्हा एकदा प्रभाससाठी शरद केळकरची आठवण झाली आहे. प्रभासला बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर शरद केळकरचाच (Sharad Kelkar) आधार आहे, हे निर्मात्यांना समजलं आहे. तर शरद केळकर प्रभासच्या बॉलीवूडमधील यशाची शिडी ठरला आहे का? असा सवाल अनेकांनी उभा केला आहे.
आणखी वाचा : 'लग्नाच्या काही महिन्यांनंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम 'प्रिन्सची' फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत
एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटांमध्ये प्रभासला शरद केळकरनं आवाज दिला होता. संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. 'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2' ने बॉक्स ऑफिसवर केवळ विक्रमच केले नाहीत तर प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवलं. म्हणजे एकप्रकारे 'बाहुबली' प्रभासला बॉलिवूडचा 'स्टार' बनवण्यात शरद केळकरचीही महत्त्वाची भूमिका होती. (Adipurush Makers Rope In Sharad Kelkar As Prabhas Voice In The Film Man Behind Actor s Success In Bollywood )
आणखी वाचा : 'अक्षयपासून दूर राहा', दुप्पट वयाच्या रेखा यांच्या कृती पाहून रवीना टंडनचा संताप अनावर
आणखी वाचा : 'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्रीचा 'ते' बोल्ड फोटो होतोय व्हायरल
जेव्हा 'साहो' आणि 'राधे श्याम' प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी प्रभासच्या खराब हिंदी आणि स्लो डायलॉग डिलिव्हरीवर टीका केली होती. प्रभासनं हिंदी चित्रपटांसाठी डबिंग करावं, असे सर्वांचे म्हणणे होते. दोनदा अडखळल्यानंतर आता सर्वांनाच हे समजलं. त्यामुळेच 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. यासाठी त्यांनी लगेचच शरद केळकर यांना 'आदिपुरुष'मध्ये घेतलं. या चित्रपटात प्रभू राम बनलेल्या प्रभासला शरद केळकरनं आवाज दिला आहे. 'आदिपुरुष'च्या टीझरमध्ये प्रभासला दिलेला शरदचा आवाज खूपच शोभणारा आहे. चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत.