मुंबई : अफगाणिस्तानमध्ये जन्मलेली अर्शी खान या दिवसात तेथील तालिबानच्या राजवटीमुळे खूप नाराज आहे. अर्शीचा जन्म अफगाणिस्तानात झाला होता आणि नंतर ती आपल्या कुटुंबासोबत भारतात शिफ्ट झाली. यावेळी, अर्शी तिच्या नातेवाईक आणि मित्रांशी बोलू शकत नाही. कारण देश तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबूलमध्ये तालिबान्यांनी पकडल्यानंतर तेथील भयानक दृश्याची काही झलक जगभरातील लोकांना त्रासदायक आहे. अफगाणिस्तानच्या काबूलचे हृदयद्रावक व्हिडिओ तालिबानच्या हाती आल्यापासून व्हायरल होत आहेत. विमानतळावर हजारो लोक दिसले, जे फक्त जीव घेऊन तिथून बाहेर पडण्यासाठी वेडे झालेले दिसत आहेत.


तेथील लोकांना मदत करण्यासाठी आलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या विमानांचे काही व्हिडिओ त्रासदायक आहेत. काही व्हिडीओमध्ये लोक जीव धोक्यात घालून विमानातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, तर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात लोकं उडत्या विमानातून खाली पडताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील या परिस्थितीनंतर अर्शी खान एका मुलाखतीत म्हणाली की, 


या मुलाखतीत अर्शी खानने तिची समस्या मांडली आहे. अर्शीने या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'माझा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला आणि नंतर मी कुटुंबासोबत भारतात आले. मला आता तालिबानचं शासन असलेल्या ठिकाणच्या महिलांची चिंता वाटत आहे.


ती पुढे म्हणाली, 'मी एक अफगाण पठाण आहे आणि या गोष्टी मला खूप घाबरवतात आणि माझ्या अंगावर काटा येतो. मला तिथल्या महिला नागरिकांची काळजी वाटते. माझा जन्म तिथे झाला आहे आणि आज जर मी त्यापैकी एक असते तर... फक्त ही भीती मला घाबरवते मी खूप दुःखी आहे आणि मी सध्या नीट जेवूही शकत नाही. लोक माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत, देव त्या लोकांना मदत करो. '


अर्शीने सांगितलं की तिचे काही नातेवाईक आणि मित्र अजूनही तिथे आहेत. अर्शी या मुलाखतीत म्हणाली की, आता ती फक्त काही जादू होण्याची वाट पाहत आहे.


अफगाणिस्तानात तालिबानच्या परत येण्याची भीती खूप धोकादायक दिसते. तालिबान राजवटीत महिलांना सर्वाधिक धोका आहे आणि म्हणूनच त्यांना सर्वात जास्त भीती वाटते. असं म्हटलं जातं की, तालिबान 12 वर्षांच्या मुलींचे घरोघरी अपहरण करून त्यांना लैंगिक गुलाम बनवत. देशातील विविध शहरांमधून महिला आणि मुलींचं अपहरण केलं जात असल्याचं वृत्त आहे. महिलांना बुरख्याशिवाय पाहून तालिबानी लढाऊ त्यांच्यावर गोळ्या झाडत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुष जोडीदाराशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.