मुंबई : सैफ अली खान केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. अभिनेत्याचं पहिलं लग्न 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंगसोबत झालं होतं. लग्नाच्या वेळी सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. तर दुसरीकडे अमृता सिंग हे त्यावेळचं इंडस्ट्रीतलं एक प्रसिद्ध नाव होत. अमृतापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केल्याचं सांगितलं जातं. या लग्नातून अमृता आणि सैफला दोन मुलं झाली. ज्यांची नावं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाची काही वर्षे सगळंकाही ठीक होतं, पण त्यानंतर सैफ आणि अमृता यांच्यात वारंवार भांडणं होत होती. याचा परिणाम असा झाला की, लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एका मुलाखतीत सैफ अली खानला विचारण्यात आलं की, चांगल्या जीवनसाथीमध्ये तो कोणते गुण शोधतोय?


या प्रश्नाचं उत्तर देत सैफ अली खानने आपलं मनातल्या गोष्टी मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने सांगितल्या. सैफ म्हणाला की, चांगल्या लाइफ पार्टनरमध्ये काही गुण असले पाहिजेत जसं की, त्याने तुम्हाला बोलण्यातून जज करू नये, तसंच तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यापेक्षा लहान असावा.


लाईफ पार्टनर हा आनंदी स्वभावाचा असावा. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी सैफने करिनाशी लग्न करण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या होत्या. त्याचबरोबर, 2012 मध्ये सैफने करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं. त्यामुळे सैफला करीनामध्ये तेच गुण दिसले असतील असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.