Manjiri and Prasad Reel : लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांची जोडी ही चांगलीच चर्चेत असते. प्रसाद आणि मंजिरी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टची नेटकरी नेहमीच प्रतिक्षा करत असतात. मंजिरीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. कारण या व्हिडीओत मंजीरीचं एक वाक्य ऐकल्यावर प्रसाद कसा घाबरून पळून जातो ते पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंजिरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजिरी आणि प्रसाद हे दोघेही घरात येताना दिसते. त्यानंतर लगेच मंजिरी बोलते की प्रसाद जरा दरवाजा बंद कर मला जर तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर प्रसादच्या चेहऱ्यावर तो घाबरल्याचे दिसते. त्यानंतर दरवाजा बंद करण्याच्या जागी प्रसाद गपचूप घराच्या बाहेर जातो आणि दरवाजा लावतो. तर मंजिरी त्याला बोलायला सुरुवात करते. हा व्हिडीओ शेअर करत मंजिरीनं कॅप्शन दिलं की “मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय” हे वाक्य ऐकल्यावर नवऱ्याच्या पोटात गोळा का येतो ???' त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा...' मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य


त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. फक्त नेटकरी नाही तर सेलिब्रिटींनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. समिल चौगुले कमेंट करत म्हणाला की, हो, एकदम योग्य आहे. तर स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर यांनी देखील अशा कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'वैवाहिक जीवन जगत असताना एवढा कॉन्फिडन्स असायला हवा...' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पण तुम्ही सर, धाडस गोळा करून बाहेर गेलात हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या रील नंतर ची....रील....खरी.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हाहाहा तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहुन आनंद झाला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मी तर सरळ दुसऱ्या दिवशी सकाळी येतो.' तिसरा नेटकरी समीच चौघुलेची आठवण काढत म्हणाला, 'समीर दादा असता तर नुसता दरवाज्याचा आवाज काढून पळून गेला असता.'