मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालात, की तुम्ही रातोरात स्टार बनतात असं बोललं जातं. पण त्यासाठी तुमचा कॉनटेन्टदेखील तितकाच हटके असणं गरजेचं असतं.लोकांची पसंती मिळवायची असेल तर तुम्हाला त्यांचं मनं जिंकता आलं पाहिजे. सोशल मीडियावर अनेकजण व्हिडिओ आणि फोटो शेअर करत फॉलोवर्सचं लक्षवेधून घेत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात आता आई आणि मुलाची एक जोडी सध्या सगळ्यांच्याच पसंतीस उतरते आहे. इंस्टाग्रामवर या आई आणि मुलांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रथमेश कदम असं या मुलाचं नाव आहे. 



त्यात त्यांच्या अ‍ॅक्टींगचे आणि डान्सचे व्हिडिओज खूपच व्हायरल होऊ लागले. आता इंस्टाग्रामवर प्रत्येकाला ही स्टार आई हवी हवीशी वाटते आहे. अभिनयासह त्यांना उत्तम डान्स देखील जमतो.