Pushpa 2 OTT Released : 'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटाची क्रेझ काही झाल्या कमी व्हायचं नाव नाही. दरम्यान, चित्रपटाच्या OTT रिलीजवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरतोय. या चित्रपटानं एकामागे एक रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट कधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार यावरून चर्चा सुरु होती. हा चित्रपट 9 जानेवार रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी हे स्पष्ट केलं आहे की लवकर हा चित्रपट ओटीटीवर येणं हे शक्य नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, निर्मात्यांनी चाहत्यांना ओटीटी रिलीजवरून अपडेट दिली असली तरी देखील चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या 15 दिवसातच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तर या चित्रपटानं ब्लॉकबस्टर ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत स्वत: चं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अफवा सुरु होत्या की हा चित्रपट 9 जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. 



प्रोडक्शन हाऊसनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये मॅथरी मूव्हीजनं त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात स्पष्ट शब्दात त्यांनी लिहिलं आहे की 'हा चित्रपट 9 जानेवारी रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार नाहीये. त्याशिवाय या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून ज्या अफवा सुरु आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा असं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्याशिवाय आता येणाऱ्या या सुट्टीच्या दिवसांमध्ये सगळ्या प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय 56 दिवसांच्या आत हा चित्रपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. हा #WildFirePushpa फक्त चित्रपटगृहातच राहणार आहे.'


'पुष्पा 2: द रूल' या चित्रपटानं दोन आठवड्यात हिंदी भाषेत 600 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटांच्या निर्मात्यानुसार, अल्लू अर्जुननं जगभरात 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 1580 कोटींची कमाई केली आहे. 


हेही वाचा : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित


या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. अल्लू अर्जुननं या चित्रपटात ‘पुष्पाराज’ ही भूमिका साकारली आहे. त्यासोबत रश्मिका मंदानानं ‘श्रीवल्ली’ आणि फहाद फासिलनं ‘एसपी भंवर सिंह शेखावत’ ही भूमिका साकारली आहे.