Santosh Movie : ऑस्कर 2025 मध्ये ज्या हिंदी चित्रपटानं स्वत: ची जागा करत शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यासोबतच आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी भारतात हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा केली आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊया हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, शहाना गोस्वामीचा संतोष हा चित्रपट फक्त पुढच्या 20 दिवसात अर्थातच 10 जानेवारी 2025 मध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. उत्तर भारताच्या एका गावातील ही कधा आहे. उत्तम भारताच्या गावातील ही कथा हिंदी भाषेत तेही एका इंटरनॅशनल को-प्रोडक्शननं बनवली आहे. तर हाच चित्रपट हा 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' या कॅटेगरीपर्यंत पोहोचू शकला आहे.
या लिस्टमध्ये जगभरातून तब्बल 85 एन्ट्री आल्या होत्या. त्यातून 15 निवडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाला इंग्लंडकडून अकादमी अवॉर्ड्स 2025 साठी ऑफिशियल सबमिशन म्हणून पाठवण्यात आला. चित्रपटाचं प्रीमियर मे 2024 मध्ये 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील झाला होता आणि क्रिटिक्सकडून या चित्रपटाची स्तुती करण्यात आली आहे.
या चित्रपटाची पटकथा ही एका विधवा असलेल्या महिलेची आहे. ही महिला तिच्या दिवंगत नवऱ्याच्या जागी पोलिस कॉन्सेबलची नोकरी करते. चित्रपटात शहाना गोस्वामी संतोष सैनी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जेव्हा तिच्यावर एक मर्डर केस सॉल्व करण्याची जबाबदारी देण्यात येते, तेव्हा ही कथा एका वेगळ्याच मार्गावर जाताना दिसते. संतोषला, एकीकडे स्वत: या केसमध्ये अडकल्याचे जाणवते तर दुसरीकडे तिला एका अनुभवी अधिकारी गीता यांची मदत मिळते. त्यानंतर गीता आणि संतोष दोघी मिळून ही केस सॉल्व करतात.
दरम्यान, या चित्रपटानं भारतातील संविधान आणि कायद्याचं सत्य काय आहे त्याची झलक दाखवली आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे 45 दिवसात पूर्ण करण्यात आलं. संध्या सूरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही ब्रिटेन, जर्मनी, भारत आणि फ्रान्सच्या फिल्ममेकर्सनं मिळून केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.