लग्नाची चर्चा सुरु असतानाच Alia Bhatt विरोधात तक्रार दाखल
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आलिया सध्या रणबीर कपूरसोबत लग्नाबद्दल चर्चेत असताना, एका टीव्ही जाहिरातीमुळे ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे.
आलियाच्या 'कन्यादान' ब्रायडल वेअर जाहिरातीवरील वाद वाढत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने आलिया भट्टविरोधात ब्रायडल वेअर कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप
आलियाच्या 'कन्यादान'ची ही जाहिरात गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. समाजातील एका वर्गाला जाहिरातीत 'कन्यादान' बदलून 'कन्यामान' करण्यास आक्षेप आहे.
तक्रारदाराने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आलिया भट्टची ही जाहिरात हिंदूंच्या भावना दुखावत आहे, कारण यात कन्यादान प्रतिगामी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी आणि आलिया भट्ट यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.