ऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ 2005-06 च्या आसपासचा आहे आणि त्यात ऐश्वर्या राय आपली खास शैली आणि नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. तिचा ड्रेस, तिचे सौंदर्य आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्वामुळे हा व्हिडीओ खूपचं सुंदर बनला आहे. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये काही नेटकऱ्यांनी हे देखील म्हटलं आहे की, या जाहिरातीत ऐश्वर्या रायचा लुक मॅडोनाच्या 'फ्रोझन' गाण्याच्या म्युझिक व्हिडीओसारखा दिसत आहे. जो त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला होता. ऐश्वर्याच्या नृत्य शैली आणि चित्रीकरणाची नाजूकता या व्हिडीओला अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
चाहत्यांचे प्रेम आणि सन्मान
ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची आणि अभिनयाची प्रसिद्धी नुसती भारतातच नाही तर जागतिक पातळीवर आहे. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी तिला अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं, 'तुमच्या सौंदर्याला उत्तर नाही, तुम्ही जे काही करताय ते अतुलनीय आहे.' दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं, ' ऐश्वर्या रायचं सौंदर्य हे काहीतरी वेगळचं आहे.' इतर नेटकऱ्यांनी ऐश्वर्या रायच्या गोड व्यक्तिमत्त्वाची आणि तिच्या अभिनयाची प्रशंसा केली.
व्यावसायिक जीवन आणि आगामी प्रोजेक्ट्स
ऐश्वर्या रायचे करिअर एकदम भव्य आणि विविधतापूर्ण आहे. 20 वर्षांपेक्षा अधिक काळात तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यात 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'जोधा अकबर', आणि 'पोनियन सेल्वन पार्ट 2' यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. ऐश्वर्याची अभिनय क्षमता आणि तिचं सौंदर्य यामुळे ती आजही एक ग्लोबल आयकॉन बनली आहे.
घटस्पोटाची चर्चा
अलीकडच्या काळात, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याबद्दल घटस्फोटाच्या अफवांनी सोशल मीडियावर एक वाद निर्माण केला होता. परंतु काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र आपल्या मुली आराध्याच्या शाळेच्या वार्षिक समारंभात दिसले. त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनदेखील उपस्थित होते. यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
ऐश्वर्या रायच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर परत एकदा पाहण्याची इच्छा आहे आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही मोठ्या अपेक्षा आहेत.आजही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याच्या चर्चा आणि तिच्या कामाच्या कौतुकाची चर्चा आजही थांबल्या नाहीत. सोशल मीडियावर तिच्या जाहिराती, फोटोशूट्स आणि चित्रपटांच्या प्रमोशन्समुळे ती सदैव आपल्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.