मुंबई : बच्चन कुटुंबाची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिच्या सौंदर्यामुळे विशेष चर्चेत असते, तिच्या सौंदर्याचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत यात शंका नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्या राय बच्चन जितकी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या मोहक आणि आकर्षक लूकसाठी देखील ओळखली जाते. ऐश्वर्याला केवळ मोजक्या गोष्टी परिधान करत सुंदर कसे दिसावे हे माहित आहे.


अभिनेत्री तिच्या क्लासिक लूकमध्ये सर्वात सुंदर दिसण्याचे हे देखील एक कारण आहे. तिच्या या सौंदर्याचा असाच नजराणा अभिषेकसोबत त्याच्या एका चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात पाहायला मिळाला. यावेळी ऐश्वर्याने अतिशय साधे कपडे परिधान केले होते, तरीही तिचे सौंदर्य तिथे उपस्थित लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. यादरम्यान, ऐश्वर्याचा साधेपणा केवळ वरचढ ठरला नाही, तर कोणीही तिच्यापासून नजर हटवू शकले नाही.


खरं तर, हे 2010 सालातील आहे, जेव्हा ऐश्वर्या राय तिचा पती अभिषेक बच्चनसोबत 'खेलें हम जी जान से' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. यादरम्यान ऐश्वर्याने स्वतःसाठी एक साधी साडी निवडली, जी तिने कॉन्ट्रास्ट ब्लाउजसह परिधान केली होती.



ऐश्वर्याचा लूक दिसायला साधा असला तरी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे ती सगळ्याचं लक्ष वेधते. या कार्यक्रमासाठी ऐश्वर्या राय बच्चनने भारतीय प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील गोल्डन कलरची साडी घातली होती, ज्यासोबत तिने हिरवा रंगाचा ब्लाउज मॅच केला होता. 



नाजूक दिसण्यासाठी, अभिनेत्रीने सोन्याचे कानातले घातले होते, सोबतच हातात हिऱ्याची अंगठी घातली होती. लाल रंगाचं ब्रेसलेट घातलं होतं, तिच्या हातात असलेली ज्वेलरी तिच्या सासूने म्हणजेच जया बच्चन यांनी लग्नानंतर दिली होती.


भारतीय समाजात लग्नाबाबत अनेक प्रथा प्रचलित आहेत, त्यातील एक प्रथा म्हणजे जेव्हा सासू नवविवाहित वधूचे स्वागत तिला काही भेटवस्तू किंवा वडिलोपार्जित वस्तू देऊन करते. बाकी सासू-सासऱ्यांप्रमाणेच जया बच्चन यांनीही ही प्रथा अतिशय चोखपणे पार पाडली. लग्नानंतर ऐश्वर्याने पहिल्यांदा 'जलसा'मध्ये पाऊल ठेवले तेव्हा जया बच्चन यांनी तिला मंगलोरियन स्टाईल सोन्याचे ब्रेसलेट दिले.




एकूणच काय तर बच्चन कुटुंबाच्या नवीन सुनेनं यावेळी आपल्या सासूनं दिलेली खास भेट पतीच्या इव्हेंटमध्ये परिधान केली आणि त्याची शोभा वाढवली. बऱ्याचदा ऐश्वर्या जया बच्चन यांच्या डिझाईनर साड्या परिधान करताना दिसते. अनेक शोमध्ये तिने जया बच्चन यांच्या साड्या परिधान केल्या होत्या.


मंगलोरियन स्टाईल कड्यांमध्ये हाताने सुरेख नक्षीकाम केले जाते. त्याच वेळी, ब्रेसलेटमधील फुगवटा बाहेर आणण्यासाठी बाजूला मोत्यासारखे स्टड बनवले जातात. ऐश्वर्याचा हातातील कडा देखील अगदी तसाच होता.