मुंबई : 'तान्हाजी' द अनसंग वॉरियर या सिनेमात काजोल आणि अजय देवगण यांना पाहण्यासाठी दोघांचे फॅन्स उत्सूक आहेत. ही जोडी ११ वर्षानंतर एकत्र येत आहेत. इतके वर्ष एकमेकांसोबत असताना देखील दोघं सिनेमात एकत्र झळकले नाहीत. इतक्या वर्षानंतर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यासाठी त्यांनी इतके वर्ष का घेतले याबाबत अभिनेता अजय देवगणने खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत अजय देवगणने काजोलसोबतच त्याचं करिअर आणि 'तान्हाजी' सिनेमाबद्दल बोलताना म्हटलं की, ''तान्हाजी' हा एक असा योद्धा होता ज्यांच्या बद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. पण महाराष्ट्रातील लोकं त्यांना खूप जवळून ओळखतात. महाराष्ट्रातील बाहेरच्या लोकांना ते माहित नसतील. शाळेत असताना पुस्तकात त्यांच्या बद्दल एक छोटासा पॅरेग्राम होता. हे खूप निराशाजनक होतं.'


पुढे बोलताना अजयने काजोलबद्दल म्हटलं की, 'काजोलचा रोल खूप मोठा नाही. पण तितकाच महत्त्वाचा आहे. कारण फक्त शूरवीरच बलिदान नाही देत तर त्याची पत्नी देखील खूप काही वेदना सहन करत असते. त्यामुळे मला वाटतं की या रोलसाठी काजोलची निवड योग्य होती. मधल्या काळात काजोलला खूप सिनेमाच्या ऑफर आल्या. पण तिने नकार दिला. कारण तिला योग्य प्रोजेक्टची प्रतिक्षा होती.' 


या मुलाखतीत काजोलने सिनेमाबद्दल बोलताना म्हटलं की, ज्या प्रकारे दरवर्षी बॉलिवूड सिनेमाचं कंटेटमध्ये बदल होत आहे. ते खूप छान आहे. OTT प्लेटफॉर्म्स यांचे देखील आभार की त्यांनी अशा कंटेटला स्थान दिलं. आता इंडस्ट्रीमध्ये य़ेण्याची योग्य वेळ आहे.


'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या सिनेमामध्ये अजय हा तान्हाजी मालुसरे यांची भूमिका करत आहे. तर काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका करत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमामध्ये अभिनेता सैफ अली खान देखील आहे. ज्यामध्ये त्यांनी उदयभान राठौड यांची भूमिका साकारली आहे.