Ajay Devgn on Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याचं फिटनेस रुटीन आणि पाहाटे लवकर उठतो आणि त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमारनं अनेकदा सांगितलं की तो रोज सकाळी तू सुर्योदय पाहतो. दरम्यान, अभिनेता अजय देवगणनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारच्या या सकाळी उठण्याच्या सवयीची खिल्ली उडवली आहे आणि त्याला 'दूधवाला' म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलीवुड हंगामा' ला दिलेल्या माहितीत अजय देवगणला विचारण्यात आलं की सह-कलाकार अक्षय कुमारविषयी अशी एखादी गोष्ट सांग जी कोणालाही माहित नाही. त्यावर तो म्हणाला, 'मला खरंच विश्वास आहे की त्यांना नक्कीच त्याच्याविषयी सगळं माहित असेल.' पुढे अजय म्हणाला, 'तो सकाळी 4 वाजता उठतो, हे तर तुम्हाला माहितच असेल. पण तुम्हाला माहित आहे का की तो कधी दूधवाला होता.' तर अजय देवगणचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर रोहित शेट्टीला देखील हसू अनावर झालं आणि ते दोघं मिळून अक्षयची खिल्ली उडवली.


काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात अक्षयनं त्याचं रुटीन शेअर करत सांगितलं होतं की 'मी रात्री 9-9:30 वाजता झोपतो. रोज माझी सकाळ ही 4-4:30 वाजता होते आणि माझ्यासाठी तिच वेळ आहे आणि तेव्हा माझी फॅमिली देखील झोपलेली असते. प्रत्येक व्यक्तीला 2-3 तास हवे असतात, जेव्हा ते शांत राहू शकतात.' 


हेही वाचा : देओल कुटुंबातील मुली, सूनांना चित्रपटसृष्टीत काम करण्याची परवानगी नाही पण...; अभय देओलचा खुलासा


दरम्यान, अक्षय आणि अजय देवगणविषयी बोलायचं झालं तर दोघं 90 च्या दशकापासून आतापर्यंत त्यांनी एकत्र खूप काम केलं. त्या दोघांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर 'सुहाग', 'खाकी', 'हे ब्रो' आणि आता 'सिंघम अगेन' मध्ये एकत्र दिसले. तर 'सिंघम अगेन' हा त्यांचा चित्रपट दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगण आणि अक्षय कुमारशिवाय करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर हे कलाकार दिसले. या चित्रपटातून अर्जुन कपूरनं खलनायकाची भूमिका साकारली आहे.