मुंबई : कोरोना व्हायरस विरोधात देशात लढाई सुरु असताना बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ने मुंबई पोलीस फाउंडेशनला २ कोटींची मदत केली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) कमिश्नर परमबीर सिंह यांनी ट्विट करत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. परमबीर सिंह यांनी म्हटलं की, मुंबई पोलीस फाउंडेशनमध्ये २ कोटींचं योगदान दिल्यामुळे मुंबई पोलीस अक्षय कुमार यांचे धन्यवाद मानते. तुमची मदत शहराच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनात खूप फायदेशीर ठरेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्विटवर प्रतिक्रिया देताना अभिनेता अक्षय कुमारने कोविड-19 (Covid- 19) मुळे जीव गमावलेल्या हेड कांस्टेबल चंद्रकांत पेंडूरकर आणि संदीप सुर्वे यांना श्रद्धांजली वाहिली आणि इतरांना ही मदतीचं आवाहन केलं आहे. त्याने म्हटलं की, "मी मुंबई पोलीस हेड कांस्टेबल चंद्रकांत पेंडूरकर आणि संदीप सुर्वे यांना सलाम करतो. ज्यांनी कोरोनाशी लढताना जीवनाचं बलिदान दिलं. मी माझं काम केलं. मला आशा आहे की तुम्ही देखील कराल. आपल्याला हे विसरता कामा नये की त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आणि जिवित आहोत.'



याधी अक्षय कुमारने पर्सनल प्रोटेक्टिव इक्विप्मेंट (पीपीई), मास्क आणि रॅपिड टेस्टिंग किट बनवण्यासाठी बीएमसीला ३ कोटींची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने मुंबई पोलीस आणि बीएमसीचे आभार मानले. त्याने म्हटलं की, "आमचं कुटुंब आणि आम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांची एक सेना आहे. जी रात्रंदिवस मेहनत करते. चला सगळे मिळून #DilSeThanku त्यांचे आभार मानू. कारण आपण इतकं तर करुच शकतो.." 


अक्षय कुमार जेव्हा जेव्हा देश अडचणीत असतो. तेव्हा मदतीसाठी पुढे येतो. याआधी त्याने पीएम केअर्स फंडसाठी २५ कोटींची मदत केली आहे. यानंतर ही त्याच्याकडून मदत सुरुच आहे.