Akshay Kumar Family Dinner Night Out : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच त्याच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतो. ना तो कोणत्या पार्टीमध्ये सहभागी होतो ना कोणत्या लग्नात कधी सतत दिसतो. याशिवाय तो कधीच पब्लिक प्लेसमध्ये दिसत नाही. पण काल मंगळवारी रात्री एक वेगळंच चित्र सगळ्यांना पाहायला मिळालं. अक्षय कुमार त्याची पत्नी ट्विंकल आणि मुलांसोबत डिनरवर गेला होता. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. नेहमीच लवकर झोपणारा अक्षय यावेळी उशिरा कुटुंबासोबत डिनरवर गेल्याचे दिसले. मंगळवारी रात्री तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत गेला होता. सोशल मीडियावर अक्षयचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्या व्हिडीओतील लोकांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अक्षयच्या या व्हिडीओत त्याची लेक नितारा तिचे काही मित्र-मैत्रिणी आणि अक्षयचा मुलगा आरव देखील दिसला. ते रेस्टॉरंटमधून बाहेर आले आणि थेट गाडीत जाऊन बसले. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. खरंतर, इतक्या रात्री अक्षयचं बाहेर निघणं सगळ्यांसाठी आश्चर्यचकीत करणारं होतं. तर अनेकांनी कमेंट करत व्हिडीओत दिसणारी ती मुलगी कोण आहे असा प्रश्न विचारला आहे? त्यानंतर अक्षय आणि ट्विंकल रेस्टॉरंटमधून बाहेर निघाले. त्या दोघांनी पापाराझींसाठी पोज देखील दिले. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : Oscars 2025 च्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर! मात्र भारतीय कनेक्शन असलेला 'हा' चित्रपट सिलेक्ट


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर अक्षय कुमार लवकरच संदीप केवलानी दिग्दर्शित स्काय फोर्समध्ये दिसणार आहे. या चित्रपटात निमरत कौर, सारा अली खआन आणि वीर पहाडिया महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच सारा आणि वीर पहाडियाचा एका गाण्याचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला. तर त्यांच्यानंतर लवकरच अक्षय कुमार आणि निमरत कौर हे देखील एका गाण्याचं शूट करणार आहेत. आज या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.