Akshaya Deodhar-Hardeek Joshi : झी मराठीची 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठकबाई खऱ्या आयुष्या एकत्र आले आहेत. अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचं नुकताच लग्न झालं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. आता लग्नानंतर अक्षया आणि हार्दिकचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये राणा दा आणि पाठक बाई देव दर्शनाला गेल्याचं कळत आहे. (akshaya deodhar father video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर राणा दा आणि पाठक बाई देव दर्शनासाठी निघाले आहेत. दोघं वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पोस्ट करत अक्षयाने कॅप्शनमध्ये, 'अहा ' असं लिहिलं आहे. चाहत्यांनी देखील त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. (hardeek joshi movies)



हार्दिक आणि अक्षया यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत हार्दिक आणि अक्षयाने सप्तपदी घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीनं त्यांचा विवाह सोहळा पार पला आहे. विवाहबंधनात अडकून हार्दिक आणि अक्षयानं नवीन आयुष्याला सुरुवात केली.  (hardeek joshi marriage) 


गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक त्यांच्या लग्नाच्या बातमीची प्रतिक्षा करत होते. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत त्या दोघांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, हार्दिकनं त्यांच्या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्याचे फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. (hardeek joshi ral life wife)