पिंक लेहेंगा, डोक्यावर बिंदी... आलियाचा ब्रायडल लूक पाहिलात का?
गंगुबाई काठीयावाडी या सिनेमामुळे आलिया भट खूप चर्चे आली. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्याला फॅान्सने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सिनेमामधला आलियाचा
मुंबई : गंगुबाई काठीयावाडी या सिनेमामुळे आलिया भट खूप चर्चे आली. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्याला फॅान्सने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सिनेमामधला आलियाचा
लूक, तिच्या डायलॅाग्सने सगळ्यांनाच वेड लावले आहे. सोशल मीडियावर तर तिच्या ऍक्टींगची सगळेच कॅापी करुन व्हिडीओ शेअर करत आहेत. गंगुबाई काठीयावाडीमुळे आलियाच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं आहे आणि आलियाने पुन्हा एकदा बॅालीवुडमध्ये तिचे वर्चस्व सिद्ध केलं आहे.
पण आता अजुन एका गोष्टीमुळे आलिया भट चर्चेत आली आहे, ती म्हणजे आलियाचा ब्रायडल लूक. पिंक लेहेंगा, हेवी विंटेज ज्वेलरी, डोक्यावर बिंदी आणि घायाळ करणारं तिचं हसणं. यामुळे तिचे फॅन्स तिचं कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही.
हा फोटो पाहुण तुम्हाला वाटेल की आलिया लग्न करते की काय? पण तस काही नाही. खरंतर तिचा हा लूक आहे एका ऍडमधला. पर्कच्या ( PERK) ऍडमध्ये आलिया नववधू बनली आहे, आणि पावेल गुलाटी तिच्या नवऱ्याच्या भुमिकेत दिसत आहे. ऍडमध्ये जेव्हा आलिया एन्ट्री करते तेव्हा तिचा लूक अनेकांना घायाळ करणारा आहे. पण जेव्हा वरमाळा गळ्यात घालण्याची वेळ येते तेव्हा तिचे ऍक्प्रेशन पाहुण तुम्हाला तिला पहातचं रहावेसे वाटेल.
खरंतर जेव्हा आलिया वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात घालायला जाते तेव्हा नवऱ्याचे मित्र त्याला वर उचलून घेतात, तेव्हा आलिया पर्क खाते मग ती हवेत वर उचली जाते. नवऱ्याचे मित्र त्याला अजुन वर उचलतात तर आलिया पुन्हा पर्क खाते आणि आणखी वर उचली जाते. अशा प्रकारे रचनात्मक ऍड आपल्याला पहायला मिळते.