CSK चं ठरलं! IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 'या' 10 खेळाडूंना संघात घेण्यासाठी खिसा रिकामा करणार

आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24आणि 25 सप्टेंबरला होणार असून याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहील आहे. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी हे ऑक्शन होणार असून यात एकूण 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलंय. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये असे 10 खेळाडू आहेत ज्यांच्यावर ऑक्शनमध्ये सीएसके हमखास बोली लावू शकते.   

| Nov 12, 2024, 21:16 PM IST
1/10

रचिन रवींद्र :

न्यूझीलंडचा स्टार ऑल राउंडर रचिन रवींद्रने 2024 चेन्नई सुपरकिंग्समधूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. रचिन रवींद्र हा CSK साठी चांगला पर्याय असू शकतो कारण तो राईट टू मॅच कार्ड (RTM) वापरून त्याच्यासाठी बोली लावू शकतात.

2/10

मिचेल सँटनर :

न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर हा सुद्धा यापूर्वी सीएसकेचा भाग होता मात्र त्याला संघातून खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. सीएसके यंदा आयपीएल ऑस्कनमध्ये कदाचित IPL 2025 च्या मेगा लिलावात संघाकडून निवडले जावू शकते.

3/10

रचिन रवींद्र :

रविचंद्रन अश्विन हा एक अनुभवी गोलंदाज असून मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी बोली लावू शकते. अश्विन यापूर्वी सुद्धा सीएसकेकडून खेळला आहे. 

4/10

डेव्हॉन कॉनवे :

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे याचा आयपीएलमधील रेकॉर्ड चांगला आहे.  2025 मेगा ऑक्शनमध्ये कॉनवेला सीएसके निवडू शकते.

5/10

ऋषभ पंत :

आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार ऋषभ पंतला रिलीज केले. ऋषभ पंत हा केवळ फलंदाज नाही तर तो उत्तम विकटकीपर सुद्धा आहे. तेव्हा सीएसके एमएस धोनीची भविष्यातील रिप्लेसमेंट म्हणून ऋषभ पंतला खरेदी करू शकते.

6/10

तुषार देशपांडे :

युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने सीएसकेमधूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले.CSK साठी त्याने 13 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मेगा लिलावात तुषार देशपांडेसाठी सीएसके बोली लावू शकते. 

7/10

दीपक चहर :

स्टार गोलंदाज दीपक चहर हा सीएसके संघाचा नेहमीच चेहरा आहे. चहरने ऑक्शनपूर्वी विश्वास व्यक्त केला की सीएसके त्याच्यावर बोली लावून त्याला पुन्हा संघात संधी देतील.   

8/10

शार्दुल ठाकूर :

शार्दुल ठाकूर हा काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे जो चांगल्या गतीने फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतो. CSK त्याला IPL 2025 मेगा लिलावात निवडू शकते.

9/10

ईशान किशन :

मुंबई इंडियन्सचा चेहरा असलेल्या ईशान किशन याला ऑक्शनसाठी रिलीज करण्यात आले आहे. तेव्हा विकटकीपर फलंदाज म्हणून ईशान किशनसाठी सीएसके बोली लावू शकते. 

10/10

हर्षल पटेल :

आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा गोलंदाज हर्षल पटेलवर सुद्धा सीएसके मोठी बोली लावू शकते. हर्षलच्या नावावर 106 सामन्यात 135 विकेट्स आहेत.