`वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...`, Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी
Alia Bhatt रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.
Alia-Ranbir Request To Paparazzi not click Photo Of Raha: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली जोडी आहे. या दोघांची जोडी रुपेरी पडद्यावरही प्रेक्षकांना प्रचंड भावते. आलिया भट्ट तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. रणबीर आणि आलियानं लग्न केल्यानंतर त्यांच्या आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आलियाने काही दिवसांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरन तिचं नाव 'राहा' ठेवलं आहे. तिच्या जन्मानंतर राहा कशी दिसते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
राहाची एक झलक पाहण्यासाठी फक्त चाहते नाही तर पापाराझी देखील आतुर आहेत.पापाराझी फोटो क्लिक करण्यासाठी उत्सुक आहे. असं असताना आपल्या खासगी आयुष्याबाबत या जोडीने मोठा निर्णय घेतला आहे. पापराझींसोबत आलिया, रणबीर आणि नीतू कपूरनं (Neetu Kapoor) एक मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये त्यांनी आपल्या मुलीचा फोटो क्लिक न करण्याबाबत आवाहन केलं. मात्र पापाराझींना आलियानं ही विनंती हटके अंदाजात केली.
पापराझींना आलियाने काय सांगितले?
'आम्हाला माहिती आहे की, हे तुमचं रोजचं काम आहे. आम्हालाही तुमची तितकीच गरज आहे, जितकी तुम्हाला आमची गरज असते. पण काहीही करा 'राहा'चा चेहरा समोर येता कामा नये. त्या जागी वडा पाव आणि भजी लावा. आमची विनंती आहे चुकूननही राहाचा चेहरा दिसता कामा नये. फ्रेममध्ये असल्यास तिला कृपया दाखवू नका. आई-वडील म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे,' असं आलियाने पॅपराजीला सांगितलं.
'आम्हाला राहाचा चेहरा दाखवयचा नाही असं काही नाही. पण सध्या ती लहान आहे. अशात किमान दो वर्षे तरी तिला या जगापासून दूर राहू द्या. दोन वर्षानंतर आम्हीच तिला तुमच्यासमोर आणू. आई वडील म्हणून सध्या आम्हाला तिची काळजी आहे', असं देखील आलिया आणि रणबीरनं सांगितलं. दुसरीकडे या मीटिंगमध्ये सर्व पापाराझींना राहा कपूरचा फोटो दाखवला. पण त्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई केली.
हेही वाचा : Farhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग
6 नोव्हेंबर रोजी आलिया-रणबीरच्या घरी छोट्या आलियाचे आगमन झाले आहे. त्यानंतर कूपर-भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आलियाने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील होताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षावर सुरु झाला आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही रणबीर आणि आलियाला बाळाच्या आगमनाबद्दल सतत शुभेच्छा दिल्या. या सगळ्यामध्ये आलियानेही आई झाल्यानंतर पहिली पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये आलियाने सांगितले की ते पालक झाले आहेत आणि गोंडस मुलगी झाली आहे.