Alia Bhatt on Pathaan Breaking Bramhastra Record : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'पठाण' या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चित्रपटानं आता पर्यंत 316 कोटींचे कलेक्शन केले आहे. 'पठाण' चित्रपटाच्या यशावर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांची प्रतिक्रिया देत आहे. आता या चित्रपटावर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवननं (Varun Dhawan) त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया आणि वरूण धवन यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी आलियाला 'पठाण'नं 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra)रेकॉर्ड तोडण्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आलिया म्हणाली, मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपटानं प्रत्येक चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला पाहिजे. मला याचा खूप आनंद झाला आहे. 'पठानसारखा चित्रपट ब्लॉकबस्टर नाही, तर इंडियन सिनेमाचा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर आहे. जेव्हा असं होतं तेव्हा आपण फक्त कृतज्ञ असतो आणि प्रार्थना करता की हे सुरुच रहायला हवं.' आलियाच्या या वक्तव्यावर वरुण पुढे म्हणाला, 'फक्त आभारी नाही, हे आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.' 



या कार्यक्रमात आलियाला काही पत्रकारांनी राहाच्या जन्मानंतर तिच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो का? त्यावर उत्तर देत आलिया म्हणाली की हे शक्य आहे. दरम्यान, तिच्यासोबत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वरुण धवनने (Varun Dhawan) सांगितले की, "तिचं करिअर कधीच स्लो स्पीडवर चालणार नाही." पण नंतर आलियानं स्पष्ट केलं की तिचं पहिले प्राधान्य तिची लेक राहा आहे आणि जर चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ती चित्रपटांच्या संख्येपेक्षा चित्रपटाचा क्वालिटीला प्राधान्य देते. 


हेही वाचा : राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा


याविषयी बोलताना आलिया पुढे म्हणाली, "माझ्या आयुष्यातील सगळ्यात पहिली प्रायॉरिटी ही माझी मुलगी आहे. तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. पण माझे पहिले प्रेम चित्रपट आहे आणि ते माझे काम देखील आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन. कदाचित येणाऱ्या काळात माझे काम ही क्वांटीटी पेक्षा क्वालिटीला प्राधान्य देणारे असू शकते आणि ही काही चुकीची गोष्ट नाही." 


दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर, आलिया भट्ट करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे. तर याशिवाय आलिया 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार असून यात तिच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. याशिवाय लवकरच आलियाचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' प्रदर्शित होणार आहे. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. वरुण धवनबद्दल बोलायचे झाले तर, 'भेडिया'नंतर तो आता जान्हवी कपूरसोबत 'बवाल'मध्ये दिसणार आहे.