Alia Bhatt on Raha Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहा कपूर हिचा नुकताच पहिला वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता.तिच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अद्याप आलियानं आपल्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. परंतु तिच्या चाहत्यांना आतुरता आहे की कधी आलिया आपल्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर करते आहे. मध्यंतरी पापाराझींकडून राहाचे फोटो हे व्हायरल करण्यात आले होते. त्यावर आलियानं देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील 'तुम क्या मिले' या गाण्यासाठी आलिया भट्ट आपल्या लेकीला घेऊन काश्मीरला केली होती. त्यावेळी त्याची बरीच चर्चा रंगलेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु त्यादरम्यानही राहाचे फोटो हे प्रचंड व्हायरल झाले होते ज्याच्याविषयी आलियानं एक आठवण शेअर केली आहे. कॉफी विथ करण या शोचे सध्या 8 वे पर्व हे सुरू आहे. त्यामुळे यंदा करण जोहरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी आलिया भट्ट आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली होती. यंदा त्या दोघींनी अनेक खुलासे केले आहेत. आलियानंही आपल्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले आहेत. सोबत रणबीर कपूरवरही तिनं भाष्य केले आहे. राहा कपूरवरही तिनं भाष्य केले आहे. पापराझींनी जेव्हा राहाचा फोटो व्हायरल केला होता तेव्हा नक्की काय घडलं होतं यावर तिनं याचा खुलासा केला आहे.


हेही वाचा : 'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा


गप्पा सुरू असताना करण जोहर आलियाला उद्देशून म्हणाला की, ''मला वाटतं की आलिया ही आपल्या लेकीसाठी, राहासाठी तिची काळजी घेण्याच्या सतत प्रयत्नात असते. असं का?'' त्यावर आलिया म्हणते की, ''खरंतर, त्यावेळेला मला आठवतं की तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्या लेकीचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तेव्हा मी तिला काश्मिरला घेऊन गेले होते जेव्हा माझ्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या शुटिंगला गेले होते.'' 


तेव्हा माझ्यासाठी तो काळ थोडासा कठीण होता कारण राहाला जन्म दिल्यानंतर मी पहिल्यांदा शुटिंगसाठी बाहेर आले होते. कोणी काहीही म्हणो परंतु माझ्यासाठी थोडंसं हे कठीणचं होतं. त्यापुढे ती म्हणाली की, ''मी राहासाठी स्तनपान करत होते. त्यातून मला शूटिंगसाठीही वेळ काढणं फारच गरजेचे होते. तेव्हा मी रणबीरला फोन केला आणि सांगितले की मला खरंच इथे खूपच त्रास होतो आहे. तो म्हणाला की काळजी करू नकोस. मला राहाला घेण्यासाठी येतो. मी तिला परत नेईन. मी माझं कामंही पुढे ढकलं आहे. ती माझ्यासोबत राहेल. ते तो बोलला आणि तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं.'' 


राहाचा फोटो फोटो व्हायरल झाला तेव्हा... 


तेव्हा ती म्हणाली की, जेव्हा मी फिरत होते तेव्हा मला समजलं की माझ्या लेकीचा फोटो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्यात तिचा चेहरा हा बऱ्यापैंकी दिसत होता. हे पाहून मला फारच दु:ख झाले. मला याचे वाईट नाही की लोकांना मला तिला दाखवायचे नाही त्याऊलट मला तर तिच्यावर प्रचंड प्रेम आहे त्यातून आम्हाला तिचा फार अभिमानही आहे.