'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा

Amitabh Bachchan on Utensils: 'कौन बनेगा करोडपती'चं 15 पर्व सुरू आहे. सध्या यातील प्रत्येक एपिसोड हा प्रचंड व्हायरल होत आहे. नुकत्याच एका एपिसोडमधून त्यांनी एक रंजक गोष्ट सांगितली आहे. ज्याची सध्या बरीच चर्चाही रंगलेली आहे.   

गायत्री हसबनीस | Updated: Nov 16, 2023, 03:00 PM IST
'मी खरकटी भांडी घासली, बाथरूमच्या...' स्पर्धकाच्या प्रश्नावर बिग बींनी न संकोचता केला खुलासा title=
amitabh bachchan speaks on did he ever washed utensils in kbc latest episode

Amitabh Bachchan on Utensils: सध्या कौन बनेगा करोडपतीचे 15 वे पर्व जोरात सुरू आहे. त्यामुळे सध्या अमिताभ बच्चन यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी अमिताभ बच्चन हे आपल्या अनेक आठवणीही शेअर करताना दिसतात. उपस्थित स्पर्धकही त्यांच्याशी गप्पा मारताना दिसतात. यावेळी अशाच एका प्रश्नाचे अमिताभ बच्चन यांनी न संकोचता उत्तर दिले आहे. सध्या त्यांनी सांगितलेल्या एका किस्स्याची चर्चा आहे. आपल्याला वाटतं की मोठे सेलिब्रेटी, नामवंत व्यक्ती या आपल्यापेक्षा वेगळं आयुष्य जगत असतात परंतु तसे नसते. तेही आपल्या सारखेच असतात याचे जिवंत उदाहरण अनेकदा आपल्यालाही पाहायला मिळाले आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितलेली आठवणही काहीशी अशीच आहे. 

यावेळी  हर्ष शाह नावाचे स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की ते आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये हातभार द्यायचे. त्यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांचा प्लास्टिक मोनोफिलामेंट यार्नचा बिझनेस आहे. ते भांडी घासायचा ब्रश तयार करतात असं यावेळी त्यांनी सांगितले आहे. ही आठवण सांगता सांगता या स्पर्धकानं अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला की तुम्ही कधी भांडी घासली आहेत का? त्यावर अमिताभ बच्चन यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. 

''हो. मी बऱ्याचदा भांडी घासली आहेत. खरकटी काढली आहेत. बाथरूम आणि तिथलं सिंकसुद्धा साफ केलं आहे. लोकांना असं का वाटतं की मी यापैंकी काहीच काम केलं नसेल?'' असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सगळीकडे एकच हशा पिकला होता. 

हेही वाचा : 'ना मालिका, ना चित्रपट मग पैसे येतात कुठून?', मिताली ट्रोल होताच सिद्धार्थनं ढाल होत दिलं स्पष्टीकरण

अमिताभ बच्चन हे आज 81 वर्षांचे आहेत परंतु त्यांची सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांचे एकाहून एक सरस चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. मागच्या वर्षी त्यांचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रचंड गाजला होता. आता या चित्रपटाचा पुढील भागही प्रदर्शित होणार आहेत ज्याचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपुर्वी टायगर श्रॉफ आणि क्रीती सनन हिचा 'गणपत' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही ते दिसले होते. 

आता ते 'कल्कि २८९८ ईडी' या चित्रपटातूनही झळकणार आहेत. या चित्रपटात दीपिका पादूकोण आणि कमल हसनही दिसणार आहेत. या चित्रपटाचीही प्रेक्षकांना बरीच चर्चा सुरू आहे.