मुंबई : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे मात्र स्टार्स मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी जात आहेत. त्यामुळे अशा कलाकारांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात येत आहे. कोरोना रूग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे, तर दुसरीकडे स्टार्स मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकताच अभिनेत्री आलिया भट्ट मालदीवहून परतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरतात दाखल होताच तिने  कोरोना काळात नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 'फारचं अनिश्चित काळ सुरू आहे. इनफ्रास्ट्रक्चर आणि योग्य माहिती  काळाची गरज आहे. गरजू लोकांपर्यंत योग्य माहिती देणं आवश्यक आहे. कारण त्यांची मदत केली जावू शकेलं.'



पुढे आलिया म्हणाली, 'मी आनंदी आहे. फाये डिसूझासोबत मी या मोहिमेत सहभागी झाली आहे. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोण्यासाठी मी प्रयत्न करेल. त्यापेक्षा जास्त काही होत असेल तरीही करेल... स्वतःची काळजी घ्या...' अशी पोस्ट आलियाने केली. मात्र यापोस्ट नंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 


मालदीवमध्ये सुट्ट्यांचा  आनंद घेवून आल्यानंतर तिने सतर्कतेची पोस्ट केली आहे. त्यामुळे ट्रोलर्सने आलियाला 'कशी होती मालदीव ट्रिप? असा प्रश्न विचारत आहेत. फक्त ट्रोलर्स या कलाकारांवर टीका करत नसून बॉलिवूडमधील काही मंडळींनी देखील यावर प्रश्न उपस्थित केला.