Alia Bhatt's Baby Name: बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी गोंडस मुलीला जन्म दिला. डिलिव्हरीसाठी अभिनेत्रीला  सकाळी 7.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या कपूर आणि भट्ट कुटुंबात (kapoor and bhatt family) आनंदाचं वातावरण आहे. आलियाने मुला जन्म देण्यानंतर अभिनेत्री चिमुकलीचं नाव काय ठेवेल याकडे लक्ष लागलं आहे. आलिया भट्टने जन्माआधीच बाळाच्या नावाबाबत संकेत दिले होते.  डिलीव्हरी आधीच आलियाने होणाऱ्या बाळाचं नाव ठरवलं होतं.  (ranbir kapoor alia bhatt)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाने स्वतःच्या आणि पती रणबीरच्या नावावरुन बाळाचं नाव ठरवलं होतं. आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं प्रमोशन करत होती. तेव्हा आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला. मुलाखती दरम्यान आलियाला विचारलं, 'तिचं नाव आलिया ऐवजी दुसरं असतं, तिने कोणत्या नावाची निवड केली असती.' तेव्हा आलियाने आवडत्या नावाबद्दल सांगितलं. (ranbir kapoor alia bhatt baby)


आलिया भट्टने तिचं आवडतं नाव आयरा सांगितलं. आयरा नावाचं वैशिष्ट्य म्हणजे आलियाच्या नावाचं पहिलं अक्षर सुरुवातीला 'आ' असून   रणबीरच्या नावाचं पहिलं अक्षर शेवटी 'र' आहे. त्यामुळे आलिया आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवू शकते असा अंदाज बांधला जात आहे. (alia bhatt and ranbir kapoor blessed baby girl)



आयरा नावाचा अर्थ
आयरा नावाचा अर्थ अत्यंत खास आहे. आयरा म्हणजे ज्यांचा आदर केला जातो, ज्यांच्यापासून लोक प्रेरणा घेतात. आयरा हे नाव विद्येची देवी सरस्वतीचे आहे. (alia bhatt and ranbir kapoor baby first picture)