मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील फार कमी सदस्यांना आपण ओळखतो. पण त्यांच्या कुटुंबातील एक मुगली फार सुंदर दिसते. तिचं नाव आहे नैना बच्चन. नैना एक इनवेस्टमेंट बँकर आहे. नैना बच्चन (Naina Bachchan)  मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांचे भाऊ अजिताभ बच्चन आणि रमोला बच्चन यांची मुलगी आहे. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांची चुलत बहिण आहे. नैनाचे तीन भाऊ-बहिण आहेत. दोन बहिण नीलिमा आणि निमृता आणि एक भाऊ भीम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नैना बच्चन (Naina Bachchan) ने अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) सोबत लग्न केलं आहे. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर 9 फेब्रुवारी 2015 साली Seychelles Islands लग्न केलं होतं. येथे या दोघांचं कुटूंबच उपस्थित होतं. नैना बच्चन (Naina Bachchan) ची चुलत बहिण श्वेता बच्चन नंदानेच नैना आणि कुणाल यांची भेट घडवून आणली होती. 



2012 मध्ये दोघं एकमेकांना डेट करू लागले. 2015 मध्ये दोघांनी लग्न केलं.   लग्नानंतर Verve Magazine शी बोलताना नैनाने सांगितलं की,'तिला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं.'  त्यानंतर कुणालने सांगितलं की,'आमची भेट एका फॅशन शोमध्ये झाली. आम्ही कोणत्याच थिएटर वर्कशॉपमध्ये नाही भेटला. करण जोहरच्या फॅशन शो होता. 



कुणाल कपूर (Kunal Kapoor) पुढे म्हणाला की `मी तेथे एका रॅम्प वॉक करता गेलो होतो. तेथे करण जोहरने मला थांबायला सांगितलं आणि तिथेच माझी आणि नैनाची ओळख झाली. 


 नैना (Naina Bachchan) चं म्हणणं आहे की,'जेव्हा मी पहिल्यांदा कुणालला भेटले तेव्हा विचार आला की,‘Wow! Tall, dark and so handsome.’  पण नंतर जाणवलं की, तो दिसतोय त्यापेक्षा तो आणखी चांगला आहे. 



नैना (Naina Bachchan) आणि कुणाल (Kunal Kapoor) च्या लग्नाला सात वर्षे झाली आहे. दोघांचं नातं दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. हे कपल अतिशय गोड आहे. कुणाल अनेकदा नैनाचे फोटो शेअर करत असतो.